सत्ता बदलली गुरूजींचे दिवसही बदलणार?

Change the days will be teachers due to power Change in State
Change the days will be teachers due to power Change in State

सोमेश्वरनगर : शिक्षक संघटनांनी डोके आपटूनही गेली पाच वर्ष 'सरकारी' प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, आता सत्ताबदलाबरोबर गुरूजींना प्रतिसाद मिळण्यास सुरवात झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 19 जानेवारीला कोल्हापूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महामंडळ सभेस हिरवा कंदील दाखविला आहे. यामुळे शिक्षणाशी संबंधित असलेले शिक्षणमंत्री, ग्रामविकासमंत्री व संबंधित अधिकारी हेही सभास्थानी येत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील पाच वर्षात शिक्षणाचे प्रश्न सुटण्याऐवजी शाळा बंद करणे, बदल्यांचा ससेमीरा, परिपत्रकांचा भडीमार, शिक्षकभरतीवर बंदी आणि नंतर भरतीचा सावळा गोंधळ, खासगीला उत्तेजन असे अनेक अघोरी निर्णयही झाले. यावर भांडणाऱ्या शिक्षक संघटनांना फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता. बहुतांश शिक्षक संघटनांचा राष्ट्रवादी व काँग्रेसशी असलेला 'सलोखा' हाच मुख्य अडसर असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता तर शालेय शिक्षणमंत्री पद काँग्रेसकडे आणि ग्रामविकास मंत्रीपद राष्ट्रवादीकडे असल्याने गुरूजींना आशा वाटत आहे.

मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे जय भगवान गोयल आहेत कोण?

शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे आदींनी नुकतीच पवार यांची भेट घेतली. चर्चेनंतर शिक्षण, आरोग्य, पाणी अशा मूलभूत विषयांना प्राधान्य देणाऱ्या पवार यांनी महामंडळ सभेचे उद्घाटक तर जयंत पाटील यांनी अध्यक्ष म्हणून येण्यास संमती दिली.

उद्धवजी, राऊताच्या जिभेला लगाम घाला; संभाजीराजे आणि राऊत यांच्यात ट्विटरयुद्ध

पवारांचा हिरवा कंदिल मिळाल्याने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आदी बडे नेते उपस्थित राहणार आहेत. सभेस हजारो शिक्षक राज्यातून येणार असल्याने महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

आधी प्रश्न रखडले आता सुटतील - बाळासाहेब मारणे
मागील पाच वर्ष सरकारकडून प्रतिसादच मिळत नव्हता. बदल्या आणि अशैक्षणिक निर्णयांमुळे गुंतागुंत आणि अस्वस्थता वाढली. आता पवारसाहेबांनी लक्ष घातल्याने दिलासा मिळेल अशी खात्री आहे. बदलीधोरण बदलणे, अशैक्षणिक कामातून मुक्ती देणे, रखडलेल्या पेनश्न, पदोन्नती व वेतनत्रुटींवर मार्ग काढण्यासाठी महामंडळ सभा घेत आहोत, असे बाळासाहेब मारणे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com