पुणे शहरातील वाढती गुन्हेगारीला रोखण्यासाठी नवीन आयुक्तांनी केले बदल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

अनलॉकनंतर शहरात वाढलेल्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्यात आली आहे. गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरेल अशी गुन्हे शाखेची निर्माण होण्यासाठी नवीन आयुक्तांनी हा बदल केला आहे.

पुणे - अनलॉकनंतर शहरात वाढलेल्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्यात आली आहे. गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरेल अशी गुन्हे शाखेची निर्माण होण्यासाठी नवीन आयुक्तांनी हा बदल केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बदल करण्यात आलेल्या गुन्हे शाखेच्या रचनेत महत्त्वाचा सामाजिक सुरक्षा विभाग थेट पोलिस उपायुक्त गुन्हे शाखेच्या एकच्या अखत्यारीत काम करणार आहे. त्या सोबतच तांत्रिक विश्‍लेषण विभाग देखील उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली असणार आहे.

पुण्यातील प्रधानमंत्री आवास योजनेची 2 हजार 929 घरांची सोडत कधी होणार पहा

मोडस ऑपरेंडी ब्युरो (एमओबी) व प्रतिबंधक विभाग एकत्रित काम करणार आहे. तसेच तपास अभियोग विभाग देखील एकत्रित काम करतील. गेल्या काही महिन्यांत गुन्हे शाखेतील काही विभागच बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे मोजक्‍याच पथकांवर कारभार सुरू आहे. त्याचा विपरीत परिमाण म्हणून गुन्हेगारी वाढली असल्याचे दिसते. त्यामुळे नवीन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बेसिक पोलिसिंगवर भर दिला आहे. गुन्हेगारांना लगाम लावण्यासाठी कडक पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काम सुरू देखील झाले आहे. आता गुन्हे शाखेला मजबूत करण्यासाठी आयुक्तांनी पाऊल उचलले आहे.

Heavy Rain: सहा तासांचा थरार, पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवले!

अशी आहे नवीन गुन्हे शाखा -
पोलिस आयुक्त- अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे शाखा- त्यानंतर दोन पोलिस उपायुक्त- त्यात एक गुन्हे शाखा व आर्थिक व सायबर गुन्हे शाखा- त्याखाली तीन सहायक पोलिस आयुक्त असणार आहेत.

पथक -
सहायक आयुक्त एक -

प्रशासन
युनिट-1
युनिट-2
युनिट-3
अमली पदार्थ विरोधी पथक
दरोडा विरोधी व वाहन चोरी पथक
पोलिस क्राईम ब्युरो (पीसीबी)
एमओबी व प्रतिबंधक

कर्जासाठी आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण करूनही मिळाले नाही कर्ज; काय आहे प्रकार वाचा

सहायक आयुक्त दोन -
युनिट 4
युनिट 5
खंडणी विरोधी पथक
दरोडा विरोधी व वाहनचोरी पथक
भरोसा
सेवा माध्यम प्रणाली
तपास व अभियोग साहाय्य कक्ष

सहायक आयुक्त तीन -
आर्थिक गुन्हे शाखा
सायबर पोलिस ठाणे
संगणक विभाग
कॉप्स एक्‍सलन्स विभाग

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Changes made new commissioner curb rising crime in Pune city