टोळीद्वारे चालवायचे समांतर शासनव्यवस्था; बऱ्हाटे, जगताप आणि साथीदारांविरोधात दोषारोपत्र दाखल!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

बऱ्हाटे हा शहरातील वादग्रस्त जमिनी शोधत असे. त्यानंतर जागा मालकाला भेटून त्याची जमीन परत मिळवून देण्याची हमी देत. त्या बदल्यात जमिनीचा काही हिस्सा अथवा मोबदला देण्याचे जागा मालकाकडून कबूल करून घेत.

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे, बडतर्फ पोलिस शैलेश जगताप आणि पत्रकार देवेंद्र जैन संघटीतपणे टोळी चालवत. तसेच टोळीच्या माध्यमातून ते समांतर शासन व्यवस्था चालवल असल्याचे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केले आहे.

एक वर्षापासून पोलिसांना देत होता गुंगारा, गुन्हे शाखेच्या युनीटने...​

जमीन आणि दोन कोटी रूपयांच्या खंडणीसाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करून बांधकाम व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दीप्ती आहेर (वय ३४, रा. व्हीला विस्टा अपार्टमेंट, बावधन), रविंद्र लक्ष्मण बऱ्हाटे (रा. लुल्लानगर, कोंढवा), शैलेश हरिभाऊ जगताप (वय ४९, रा. विश्वकर्मा इमारत, भवानी पेठ), अमोल सतीश चव्हाण (रा. चव्हाणवाडा, कोथरुड) आणि देवेंद्र फूलचंद जैन (वय ५२, प्रियदर्शनी सोसायटी, गणेशमळा, सिंहगड रोड) यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

पोलिसांच्या या कामाला सॅल्यूट कराच...माळरानावर बहरणार नंदनवन​

चव्हाण हा जगताप याचा पोलिस खात्यात असतानाचा मित्र आहे. बऱ्हाटेला कोणी विरोध केल्यास त्याचेविरूध्द पोलिस तसेच इतर सरकारी कार्यालयात खोटे अर्ज करून सरकारी यंत्रणांना त्यांच्या विरूद्ध दखल घेण्यास भाग पाडणे, गुंडामार्फत धमक्या देणे, खंडणी वसूल करणे आदी कामात जगताप आणि चव्हाण बऱ्हाटेला मदत करत. तर टार्गेट असलेल्या व्यक्‍तीविरुद्ध बातम्या प्रसिद्ध करणे, त्याद्वारे त्याची जनसामान्यातील प्रतिमा मलिन करून आपले उदिष्ट साध्य करण्याचे काम जैन करत. फिर्यादीचे आरोपी महिलेसोबत असलेल्या नाजूक आणि प्रदीर्घ संबंधाचा उपयोग करुन मोठा आर्थिक फायदा करून घेण्याचा फौजदारी कट आरोपींनी संगणमताने केला आहे, असे दोषारोपत्रात म्हंटले आहे.

पुणे पोलिसांनी गणेशोत्सवाबद्दल घेतला मोठा निर्णय; गणेश मंडळांना केले 'हे' आवाहन!​

बऱ्हाटे शोधायचा सावज : 
बऱ्हाटे हा शहरातील वादग्रस्त जमिनी शोधत असे. त्यानंतर जागा मालकाला भेटून त्याची जमीन परत मिळवून देण्याची हमी देत. त्या बदल्यात जमिनीचा काही हिस्सा अथवा मोबदला देण्याचे जागा मालकाकडून कबूल करून घेत. त्यानतर माहिती अधिकार कायद्यान्वये वेगवेगळ्या आस्थापनाकडून जमिनीची माहिती आणि कागदपत्रे काढून त्यातील कच्चे दुवे आणि त्यामध्ये हितसबंध असलेल्या व्यक्‍ती शोधून काढत.

असे करायचे फसवणूक : 
जागेची सर्व माहिती मिळाल्यानंतर बऱ्हाटे आपल्या हस्तकांना त्यात घुसवत. पीडित व्यक्‍तीस जमिनीचा वाद न्यायालयातून सोडवून देण्याचे आमिष दाखवून वेळप्रसंगी धमक्या देत. त्यानंतर त्यांच्याकडून पॉवर ऑफ अॅटर्नी, एमओयु, एमओए, विकसन करारनामा, खरेदीखत करून त्याबाबत दिवाणे-फौजदारी दावे दाखल करून मूळ मालकास जेरीस आणत. त्यामुळे जागा मालक तडजोड करण्यास तयार होत आणि मग बऱ्हाटे आपल्या हस्तकामार्फत जमीन हडप करत असे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chargesheet filed against Ravindra Barhate, Shailesh Jagtap, Devendra Jain and others