दाभोलकर हत्या प्रकरण: विक्रम भावे आज विरोधात दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

भावे याचा जामीन अर्ज यापुर्वी न्यायालयाने फेटाळला आहे. तर वकील संजीव पुनाळेकर यांना यापूर्वी जमीन देण्यात आला आहे. अॅड. पुनाळेकर यांनी दाभोलकर प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. ​

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी विक्रम भावे विरोधात आज येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्‍यता आहे.

une/death-woman-burned-shock-msedcl-cable-236777" target="_blank">महावितरणाच्या केबलचा शॉक लागून भाजलेल्या महिलेचा मृत्यू

भावे विरोधात तपास करण्यासाठी सीबीआयला 23 ऑगस्टला विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी 90 दिवसांची मुदतवाढ दिली होती. ती मुदवाढ 21 नोव्हेंबरला संपत आहे. भावे याच्या अटकेला 23 ऑगस्टला 90 दिवस पूर्ण झाले होते. त्यामुळे तपास प्रगती पथावर असून पुरावे आणि इतर तपासासाठी वेळ आवश्‍यक असल्याने न्यायालयाने दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी सीबीआयचे तपास अधिकारी आस. आर. सिंग आणि सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी केली होती.

खेळाडुकडे मागितली 25 हजाराची लाच; 'एसीबी'कडून गुन्हा दाखल, एकास अटक  

भावे याचा जामीन अर्ज यापुर्वी न्यायालयाने फेटाळला आहे. तर वकील संजीव पुनाळेकर यांना यापूर्वी जमीन देण्यात आला आहे. अॅड. पुनाळेकर यांनी दाभोलकर प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार कळसकर याने ठाणे येथील खाडी पुलावरून शस्त्र तुकडे करून फेकून दिले. तर भावे याने घटनास्थळाची रेकी करण्यास मदत केली आहे, असा दावा सीबीआयने केला आहे.
दोषारोपपत्र दाखल न केल्यास भावेला जामीन मिळू शकतो.
'एमएनजीएल'चे 70 हजार गॅस जोड लटकले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chargesheet likely to be filed against Vikram Bhave today in Dabholkar murder case