esakal | कोरोना बाधितांच्या उपचारासाठी धर्मादाय समन्वय हेल्पलाइन

बोलून बातमी शोधा

Helpline
कोरोना बाधितांच्या उपचारासाठी धर्मादाय समन्वय हेल्पलाइन
sakal_logo
By
अनिल सावळे -@AnilSawale

पुणे : कोरोना बाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचाराबाबत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाकडून धर्मादाय समन्वय हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

सरकारी यंत्रणा, महसूल, पोलिस,आरोग्य, महापालिका, सर्व खासगी, सरकारी, धर्मादाय रुग्णालयांतील डॉक्टर, नर्सिंग, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. या सर्व प्रयत्नांना पूरक असेल अशी धर्मादाय समन्वय हेल्पलाइन धर्मादाय आयुक्तालयाच्या पुणे विभागाच्या वतीने सुरु करण्यात आली आहे.या हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांना मदत देण्यासाठी सर्व यंत्रणामार्फत प्राप्त होणाऱ्या सुविधांची माहिती संकलित केली जाईल. ही माहिती गरीब गरजू लोकांपर्यंत पोचवली जाईल. या सुविधा मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना रुग्णालयात प्राप्त परिस्थितीत उपलब्ध असणाऱ्या सोयी-सुविधा सहज प्राप्त व्हाव्यात यासाठी, संबंधित रुग्णालय प्रशासनाशी समन्वय साधण्यात येईल.

हेही वाचा: 'ऑक्सिजनची पातळी होती कमी पण मी जिंकलो'

रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे.रुग्ण, त्यांचे नातेवाइक आणि इतर नागरिकांना सध्याच्या काळात खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे दोन वेळच्या जेवणाची अडचण झाली आहे. अशा सर्वांसाठी त्यांच्या परिसरातच भोजन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या प्लाझ्माची उपलब्धता करून देण्यासाठी विविध रुग्णालयांतील ब्लड बँक आणि रुग्णालय यांच्यासोबत समन्वय साधून रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कोरोना बाधित रुग्णांसाठी आवश्यक औषधांच्या उपलब्धतेनुसार ते मिळवून देण्यासाठी रुग्णांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यात येणार असल्याची माहिती धर्मादाय सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी दिली.

हेही वाचा: मृतदेहाच्या दफनसाठी जागाच शिल्लक नाही

धर्मादाय समन्वय हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांक :

020-26163891

020-26163892

020-26162728

020-26169893