

शाहू अकादमीचा
निकाल १०० टक्के
सातारा, ता. ९ : येथील छत्रपती शाहू अकादमीचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेतील ८८ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले आहे. शाळेची विद्यार्थिनी श्रेया कुशल वाघ हिने ९८.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तिला गणित आणि संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले. याबरोबरच अर्णव लक्ष्मण उबाळे याने ९८.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. त्यालाही गणित आणि संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. प्रांजली प्रमोद कांबळे हिने ९७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. संस्थेच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सर्वांची मेहनत आणि शिक्षकांच्या समर्पित कार्यामुळे शाळेचा निकाल १०० टक्के लागल्याचे वेदांतिकाराजे यांनी नमूद केले. प्राचार्या डिंपल जाधव व सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
......................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.