

BJP MLA Chitra Wagh demands police action against woman spreading defamation on social media in Wagholi, Pune.
Sakal
पुणे : वाघोली परिसरातील एका महिलेने समाजमाध्यमांवर केलेल्या बदनामीकारक चित्रफितीप्रकरणी भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. त्यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची मंगळवारी (ता. २) भेट घेऊन घटनेविषयी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर आमदार वाघ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘‘नगर रस्त्यावरील वाघोलीतील एका महिलेने माझ्याविरुद्ध चुकीचे आणि निराधार आरोप करत व्हिडिओ तयार केला.