पुणे : पर्वती टेकडीवर फिरायला गेलेल्या एका नागरिकावर चाकूने वार करुन त्यांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली असून याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे टेकड्यांवर सकाळी व सायंकाळी फिरायला जाणाऱ्या नागरीकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तुम्हाला माहिती आहे कुठे मिळतो चायनीज मांजा? मग पोलिसांना सांगा कारण..

मनोज बहुतुजे (वय 35, रा. जनता वसहात) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका 20 ते 25 वयोगटातील अज्ञात व्यक्तीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : तेलाचा साठा असलेल्या गोडाऊनला भीषण आग; जीवितहानी नाही
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सोमवारी दुपारी तीन वाजता पर्वती टेकडीवर फिरण्यासाठी गेले. त्यानंतर ते तेथील कार्तिक स्वामी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्यावर बसले होते. दरम्यान, एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आली, त्याने फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल हिसकविण्याचा प्रयत्न केला. त्यास फिर्यादी यांनी विरोध केला. त्यावेळी त्याने फिर्यादी यांच्या हनुवटीवर चाकूने वार केला. तसेच त्यांच्या तोंडावर चाकूने उलट्या दिशेने मारल्याने फिर्यादीचे तीन दात पडले. याबरोबरच त्यांच्या हाता-पायाला जबर जखम झाली. त्यानंतर आरोपीने त्यांच्याकडील सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल व दोनशे रुपये जबरदस्तीने काढून घेत तेथून पलायन केले.
पिंपरीत वाहनांची तोडफोड करुन टोळक्यांनी माजवली दहशत
फिर्यादी यांनी आरडाओरडा केल्यानंतर तेथील सुरक्षारक्षक त्यांच्या मदतीला धावून आले. सुरक्षारक्षकांनी याबाबत दत्तवाडी पोलिसांना खबर दिली. काही वेळातच दत्तवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी फिर्यादी यांना उपचारांसाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. तसेच आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ करीत आहेत.
निर्दयी! पुण्यात एक दिवसांच्या जुळ्यांना ऐन थंडीत फेकून दिले तलावाशेजारी