
मकर संक्रातीच्या निमित्ताने शहरातील हौशी नागरिक, लहान मुलांकडून पतंग उडविण्यास प्राधान्य दिले जाते. काही जणांकडून मात्र, पतंग उडविण्यासाठी चायनीज, नायलॉन मांजाचा वापर होत असल्याच्या घटना मागील काही वर्षापासून सुरू आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन शहरामध्ये दोन तरुणींना मांजामुळे आपला जीव गमवावा लागला, तर अनेकजण जखमी झाले. याबरोबरच हजारो पक्षांनाही आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. या पार्श्वभुमीवर मागील वर्षापासून पुणे पोलिसांकडून चायनीज मांजाविरुद्ध ठोस कारवाई करण्यावर भर दिला जात आहे.
पुणे : पतंग उडविण्यासाठी बंदी असलेल्या चायनीज मांजाच्या होणाऱ्या वापरामुळे पक्षांसह माणसांच्याही जीवाला धोका असल्यामुळे पोलिसांकडून शहरातील पतंग व मांजा विक्री करणाऱ्या 97 दुकानांची सोमवारी रात्री उशीरापर्यंत झाडाझडती घेतली. मात्र त्यामध्ये धोकादायक चायनीज, नायलॉन मांजा आढळला नाही. तरीही छुप्या पद्धतीने होणाऱ्या मांजा विक्री करणाऱ्यांची नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यास, संबंधीत नागरिकास पोलिसांकडून रोख रकमेचे बक्षिस मिळणार आहे.
पुणे : तेलाचा साठा असलेल्या गोडाऊनला भीषण आग; जीवितहानी नाही
मकर संक्रातीच्या निमित्ताने शहरातील हौशी नागरिक, लहान मुलांकडून पतंग उडविण्यास प्राधान्य दिले जाते. काही जणांकडून मात्र, पतंग उडविण्यासाठी चायनीज, नायलॉन मांजाचा वापर होत असल्याच्या घटना मागील काही वर्षापासून सुरू आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन शहरामध्ये दोन तरुणींना मांजामुळे आपला जीव गमवावा लागला, तर अनेकजण जखमी झाले. याबरोबरच हजारो पक्षांनाही आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. या पार्श्वभुमीवर मागील वर्षापासून पुणे पोलिसांकडून चायनीज मांजाविरुद्ध ठोस कारवाई करण्यावर भर दिला जात आहे.
पिंपरीत वाहनांची तोडफोड करुन टोळक्यांनी माजवली दहशत
पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनानुसार, पोलिसांनी यावर्षीही चायनीज मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी पोलिसांनी गुन्हे शाखेची सात पथके तयार केली होती. या पथकासह शहरातील पोलिस ठाण्यांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पतंग व मांजा विक्री करणारे 97 दुकानांची झाडाझडती घेतली.
निर्दयी! पुण्यात एक दिवसांच्या जुळ्यांना ऐन थंडीत फेकून दिले तलावाशेजारी
रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरातील पतंग व मांजा विक्रीची दुकाने तपासण्यात आली. त्यामध्ये पोलिसांना बंदी असलेला मांजा आढळून आला नाही. मात्र ही कारवाई सुरूच राहाणार असल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले. तसेच छुप्या पद्धतीने मांजा विक्री करणाऱ्यांची नावे नागरीकांकडून घेऊन संबंधीतांवर कारवाई केली जाणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मांजा विक्री करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या नागरीकांची नावे गुप्त ठेवली जाणार आहेत. तसेच संबंधीत नागरीकांना एक हजार रुपयांचे रोख दिले जाणार असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे.
माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक ः
पोलीस नियंत्रण कक्ष ः 100 किंवा 8975283100, 8975953100
Video : उजनीत भोरड्यांच्या मनमोहक कवायती
"चायनीज मांजाची विक्री होण्याची शक्यता लक्षात घेऊन 97 दुकानांमध्ये छापे घातले, मात्र तेथे चायनीज मांजा आढळलेला नाही. यापुढेही कारवाई सुरू राहील. नागरीकांनी चायनीज मांजाबाबत खबर दिल्यास, त्यांना रोख बक्षिस दिले जाईल. तसेच विक्रेत्यावर कडक कारवाई होईल.''
- अशोक मोराळे, अतिरीक्त पोलिस आयुक्त, गुन्हे.
चायनीज मांजा म्हणजे काय ?
काचेची पावडर व सरस हा द्रवपदार्थ एकत्रीत करुन त्याचे मिश्रण तयार केले जाते. हे मिश्रण अतिशय पातळ व हाताने न तुटणाऱ्या तंगूस धाग्याला लावले जाते. मकरसंक्रांतीच्या एक-दोन महिने आगोदर शहरातील ओढे, नाले, टेकड्या, नदी किंवा अन्य निर्जनस्थळावर जाऊन काही व्यक्ती हा मांजा तयार करतात. याच मांजाला चायनीज, चायनीज किंवा चायना मांजा म्हणून ओळखले जाते. प्रत्यक्षात हा मांजा आपल्याच शहरात तयार होतो. विशेषतः मुंबई, गुजरात, बंगळुरू, दिल्ली या ठिकाणी जास्त प्रमाणात तयार केला जातो.