पुणेकरांनो, महापालिकेच्या 'या' 9 रुग्णालयांत घ्या कोरोनाचे उपचार; तेही अगदी मोफत!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण या रुग्णालयांत थेट जाऊन उपचार घेऊ शकतात, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

une-news" target="_blank">पुणे : कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी, त्याला सामोरे जाण्यासाठी पुणे महापालिका प्रशासाने जोरात तयारी सुरू केली आहे. सध्या 2700 रुग्णांवर उपचार करण्याची महापालिकेची क्षमता असून 1600 रुग्ण दाखल झाले आहेत. आणखी 4 हजार रुग्ण दाखल करून घेण्याची तयारी महापालिकेने केली आहे.

वीज ग्राहकांनो,आता घरबसल्या मांडा तक्रारी; महावितरणाने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय 

कोरोनाचा सामना करण्यासाठी महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी खासगी रुग्णालयांचीही मदत घेण्यात येत असून काही वसतिगृहेही महापलिकेने ताब्यात घेतली आहेत. महापालिकेच्या 9 रुग्णालयांत सध्या दाखल झालेल्या 918 रुग्णांवर औषधांसह मोफत उपचार सुरू आहेत.

कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण या रुग्णालयांत थेट जाऊन उपचार घेऊ शकतात, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.  

- विद्यार्थी-पालकांसाठी आनंदाची बातमी; शुल्कवाढीबाबत पुणे विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय!

'या' रुग्णालयांत रुग्णांवर होणार मोफत उपचार (कंसात रुग्ण क्षमता) :

- निकमार, बालेवाडी - 1000
- सिंहगड कॉलेज होस्टेल, वडगाव बुद्रूक - 900
- सिंहगड कॉलेज, कोंढवा - 327
- ट्रिनिटी कॉलेज, कोंढवा - 220
- सणस मैदान वसतिगृह - 125
- नायडू सांसर्गिक रुग्णालय - 120
- महापालिका दवाखाना, रक्षकनगर, खराडी - 90
- द्रोपदीबाई खेडेकर दवाखाना, बोपोडी - 50
- मुरलीधर लायगुडे रुग्णालय, सिंहगड रोड - 50

- कोथरूडकरांची काळजी वाढली; औषध व्यावसायिकाला झाली कोरोनाची लागण!

''महापालिकेच्या 9 रुग्णांलयांत कोरोनाच्या रुग्णांवर मोफत उपचार सुरू आहेत. सध्या सुमारे 3 हजार रुग्णांवर उपचार करण्याची महापालिकेची क्षमता आहे. गरजेनुसार ही क्षमता 7 हजारांपर्यंत करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे.''
- डॉ. संजीव वावरे, सहआरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune these 9 municipal hospitals have free treatment for corona patients