पुणे : पेठांमधील अडथळे हटवले; पण 'या' भागातील परिस्थिती 'जैसे थे'!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

शुक्रवारी सायंकाळनंतर लक्ष्मी रस्ता आणि या रस्त्याला मिळणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवरील बांबूचे अडथळे हटविण्यात आले.

une-news" target="_blank">पुणे : कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहराच्या मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठेसह लक्ष्मी रस्त्याच्या अंतर्गत भागातील बांबूचे अडथळे शनिवारी (ता.२३) सायंकाळनंतर हटवण्यात आले. विश्रामबाग पोलिसांनी अडथळे दूर केले आहेत. 

शहराच्या मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ आणि लक्ष्मी, बाजीराव रस्त्याला जोडणारे सर्व अंतर्गत रस्ते गेले मागील दोन महिन्यापासून बंद होते. 

- पुण्यात कोरोनाचा धडाका सुरूच; सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या दोनशेच्या पुढेच!

दरम्यान, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी प्रतिबंधित भाग वगळता शहरातील अन्य भागांतील दुकाने उघडण्यास परवानगी दिली. त्यानंतर बुधवारी (२० मे) सकाळी लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कर्वे रस्ता, कुमठेकर रस्त्यासह उपनगरामधील दुकाने उघडण्यात आली. परंतु लक्ष्मी रस्त्यावरील अडथळ्यांमुळे व्यावसायिक आणि कामगारांना संबंधित ठिकाणी पोचण्यास त्रास होत होता. त्यामुळे या भागातील अडथळे काढण्याची मागणी केली जात होती.

- पुणेकरांनो, महापालिकेच्या 'या' 9 रुग्णालयांत घ्या कोरोनाचे उपचार; तेही अगदी मोफत!

शुक्रवारी सायंकाळनंतर लक्ष्मी रस्ता आणि या रस्त्याला मिळणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवरील बांबूचे अडथळे हटविण्यात आले. तसेच अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, रमणबाग प्रशाला, लोखंडे तालीम व परिसरातील अडथळे हटविण्यात आले. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अडथळे हटविले असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी सांगितले.

- विद्यार्थी-पालकांसाठी आनंदाची बातमी; शुल्कवाढीबाबत पुणे विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय!

पूर्व भागातील प्रतिबंधीत क्षेत्रातील रस्ते बंदच

विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अडथळे दूर करण्यात आले असले तरीही प्रतिबंधीत क्षेत्र असलेल्या पूर्व भागातील रस्ते मात्र बंदच ठेवण्यात येणार आहेत. तसेच या भागाकडे जाणारे रस्ते ही बंदच आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune police have removed barriers in the central part of the city after Saturday evening