पुण्यात कोरोनाचा धडाका सुरूच; सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या दोनशेच्या पुढेच!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

महापालिकेसह खासगी रुग्णालयांतील १७० रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यातील ४२ व्हेंटिलेटरवर आहेत.​

une-news" target="_blank">पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या थोडीशी कमी झाली तरीही सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे, शनिवारी (ता.२३) दिवसभरातील रुग्णांची संख्या दोनशेच्या पुढेच राहिली आहे. नवे २०५ रुग्ण सापडले असून, ९२ रुग्ण ठणठणीत झाले आहेत. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या डॉ. नायडूसह पुण्यात १ हजार ८९२ इतक्याच रुग्णांवर उपचार सुरू आहे.

- पुणेकरांनो, महापालिकेच्या 'या' 9 रुग्णालयांत घ्या कोरोनाचे उपचार; तेही अगदी मोफत!

दरम्यान, महापालिकेसह खासगी रुग्णालयांतील १७० रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यातील ४२ व्हेंटिलेटरवर आहेत.
मृतांमध्ये येरवड्यातील ६५ वर्षांच्या महिलेचा समावेश असून, त्यांना कोरोना झाल्याने १८ एप्रिला रूग्णालयात दाखले केले होते. त्यांना उच्चक्तदाब आणि न्युमोनिया होता. शुक्रवार पेठेतील ५२ वर्षांच्या पुरुषाचाही मृत्यू झाला आहे. तपासणीचा अहवाल येण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला आहे.

- विद्यार्थी-पालकांसाठी आनंदाची बातमी; शुल्कवाढीबाबत पुणे विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय!

हडपसरमधील ६५ वर्षांच्या मृत्यू झाला असून, त्यांना उच्चक्तदाब आणि मधुमेह होता. गंज पेठेतील ५१ वर्षाच्या व्यक्तीला कोरोना झाल्याने त्यांना १२ एप्रिलला दाखल करण्यात आले होते. त्यांचा शनिवारी मृत्यू झाला आहे.

- कोरोना योद्धा : तब्बल महिनाभरानं झाली माय-लेकरांची भेट!

पुण्यात आतापर्यंत ४० हजार ४९३ नागरिकांच्या घशातील द्रव पदार्थाच्या नमुन्यांची तपासणी केली असून, त्यातील ४ हजार ६०३ जणांना कोरोना झाला होता. त्यातील २ हजार ४६३ रुग्ण बरे झाले आहेत. तर २४८ जण मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या १ हजार ८९२ रुग्ण रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Third day in a row, the number of new corona patients is more than 200 in Pune city

टॅग्स
टॉपिकस