पुण्यात चक्रावातामुळे ढगाळ वातावरण

Cloudy-Weather
Cloudy-Weather

पुणे - मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर तयार झालेल्या चक्रावातामुळे आकाश ढगाळ झाले. त्यामुळे पुण्यासह परिसरात गुरुवारी संध्याकाळी ढगाळ वातावरण होते. येत्या दोन दिवसांमध्ये आकाश मुख्यतः निरभ्र राहील, असे हवामान खात्याने स्पष्ट केले. शहरात सकाळपासून आकाश निरभ्र होते. पण, दुपारनंतर वातावरणात वेगाने बदल झाले. दिवसभर उन्हाचा चटका आणि ढगाळ वातावरणामुळे वाढलेला उकाडा असे वातावरण गुरुवारी संध्याकाळी पुणेकरांनी अनुभवले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

थंडीचा काढता पाय
अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती असल्याने हवेतील बाष्प ओढून घेतले आहे. यामुळे हवामान कोरडे झाल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. त्यातच थंडीचा प्रभावही कमी होऊ लागला आहे. पुढील काही दिवस थंडी हळूहळू कमी होऊन किमान तापमानाचा पारा वाढेल. 

गेल्या १५ दिवसांपासून राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहेत. गेल्या आठवड्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर थंडीत चढउतार होत असून, थंडी कमी होण्यास सुरवात झाली. मागील तीन ते चार दिवसांपासून किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसच्या वर आहे. गुरुवारीही हा पारा १३ अंश सेल्सिअसपर्यंत सरकला. सकाळी अकरा वाजल्यानंतर उन्हाचा पारा काही प्रमाणात वाढू लागल्याने उकाड्यात वाढ होत आहे. त्यामुळे किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही वाढ होऊ लागली आहे. येत्या काही दिवस ही स्थिती अशीच राहणार आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com