मुळशी : ढगाळ हवामानामुळे आंबा पिकाला धोका

मुळशी : ढगाळ हवामानामुळे आंबा पिकाला धोका

भुकूम : मुळशी तालुक्यात आठ दिवसा पासून ढगाळ हवामान असून आज तुरळक पाऊस सर्वत्र झाला आहे. सध्या आंब्याच्या झाडांना मोहोर फुटत असून त्यासाठी धोकादायक हवामान आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यातील शेतकरींनी मोठ्या प्रमाणावर आंब्याची लागवड यापूर्वी केली आहे. तसेच तालुक्याच्या पश्चिम भाग आंबा उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. कृषी खात्याकडून रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग करण्यात आली आहे. दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्याच्या अखेर पर्यंत तालुक्यात आंबा पिकाला मोहोर येतो. 

यावर्षी नोव्हेंबर पासून थंडी फारशी पडली नाही. चांगला मोहोर फुटण्यासाठी थंडी व उन्हाची गरज असते. दरम्यान आठ दिवसांपासून ढगाळ हवामान व तुरळक पाऊस पडत आहे. सोमवारी सकाळ पासून दाट धुके, ढगाळ हवामान व पाऊस पडला आहे. त्यामुळे  मोहोर फुटण्यावर परिणाम होऊन फुटलेला मोहोर गळून जाण्याची भिती शेतकरींच्यामध्ये झाली आहे. 

यावर्षी अक्टोबर अखेर पर्यंत पाऊस होता. अतिवृष्टी व करपा रोगामुळे भाताचे पिकाचे उत्पन्न मिळाले नाही .आंब्याचे उत्पन्न तरी मिळण्याची आशा शेतकरींना आहे. दरम्यान सुरवातीसच हवामानाचे  धोकादायक वातावरण आंबा उत्पादनासाठी निर्माण झाले आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com