मुख्यमंत्र्यांची पुण्यात दर्शनयात्रा; 'या' आठ ठिकाणी करणार श्रींची आरती

ज्ञानेश सावंत
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यातील गणपतीबाप्पांची दर्शन यात्रा करणार आहेत. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींसह नवसाला पावणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ, साने गुरुजी तरुण मंडळ आणि कोथरुडमधील श्री साई मित्र मंडळांच्या श्रींची आरती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 6) होणार आहे. सायंकाळी पाच ते पावणेसात या वेळेत मुख्यमंत्री या मंडळांना भेटी देतील.

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यातील गणपतीबाप्पांची दर्शन यात्रा करणार आहेत. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींसह नवसाला पावणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ, साने गुरुजी तरुण मंडळ आणि कोथरुडमधील श्री साई मित्र मंडळांच्या श्रींची आरती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 6) होणार आहे. सायंकाळी पाच ते पावणेसात या वेळेत मुख्यमंत्री या मंडळांना भेटी देतील.

सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण

राज्यातील विधानसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मार्चेबांधणी केली असून, विशेषत: सत्तेचे सिंहासन पुन्हा राखण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष जोरदार प्रयत्न करीत आहे. त्यात मुख्यमंत्री फडणवीस हे आघाडीवर आहेत. त्याचाच भाग म्हणून फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विविध भागांत महाजनादेश यात्रा काढण्यात आली. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री पुण्यात बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यात पाणी

 मानाच्या गणपतीच्या दर्शनाला मुख्यमंत्री दरवर्षी येतात. मात्र, काही मंडळांना ते पहिल्यांदाच भेटी देणार आहेत. यानिमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस हे आगामी निवडणुकीच्या प्रचाराचा "श्रीगणेशा' करणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा या दौऱ्याला राजकीय स्वरूप देत, भाजपच्या काही इच्छुकांनी शक्तीप्रदर्शनाची तयारी केल्याचे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM devendra Fadanvis visits Pune for ganpati darshan