

सीएनजीच्या
दरवाढीचा फटका?
मुंबईत दोन रुपयांनी वाढ
नवी दिल्ली ः जागतिक तणाव आणि कच्च्या तेलाचे चढे भाव यामुळे लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार असल्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. मात्र त्याआधीच मुंबई आणि परिसरातील सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका बसणार आहे. महानगरात सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे.
महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) प्रति किलो दोन रुपयांची दरवाढ केल्यामुळे मुंबईतील सीएनजीचा नवा दर आता ८४ रुपये झाला आहे.
महानगर गॅसने सीएनजीच्या दरात प्रति किलो दोन रुपयांनी वाढ केली असून, नवी दिल्लीतील वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरात गुरुवारपासून (ता.१४) हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. यापूर्वी मुंबईत सीएनजीचा दर ८२ रुपये प्रति किलो होता, जो आता ८४ रुपयांवर पोहोचला आहे.
दरवाढीची प्रमुख कारणे
इराण-इस्राईल युद्ध आणि मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत झाल्यामुळे नैसर्गिक वायूची आयात महागली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने वायू खरेदीचा खर्च वाढला आहे. देशांतर्गत वायूची उपलब्धता मर्यादित असल्याने कंपन्यांना महागडा विदेशी गॅस अधिक प्रमाणात खरेदी करावा लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.