esakal | लॉकडाऊनमध्येही बेशिस्त वर्तणूक कायम; १९ दिवसात २५.७६ लाखाचा दंड वसूल

बोलून बातमी शोधा

 Unruly behavior persists even in lockdown
लॉकडाऊनमध्येही बेशिस्त वर्तणूक कायम; १९ दिवसात २५.७६ लाखाचा दंड वसूल
sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे: कोरोनाचा संसर्ग आटोक्यात यावा म्हणून लॉकडाऊन लावण्यात आला, मात्र, तरीही नागरिकांचे बेशिस्त वर्तणूक कमी झालेली नाही. सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन न करणे, मास्क न वापरणे अशा कारणांमुळे महापालिकेने गेल्या १९ दिवसात तब्बल २५ लाख ७६ हजार ८७० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पुण्यात कोरोनाच्या संक्रमनामुळे रोज ४ हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. तर गंभीर रुग्णांची संख्या वाढल्याने रोज पुणे शहरातील पालिकेची, खासगी तसेच ससून रुग्णालयात जवळपास दीडशे जणांचा मृत्यू होत आहे. हे प्रमाण कमी व्हावे, साथ आटोक्यात यावी यासाठी शहरात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून कडक निर्बंध लावण्यास सुरवात केली. यामध्ये सायंकाळी सहा वाजताच संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राज्य सरकारने देखील विकेंड लॉकडाऊन त्यानंतर आता शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ बंद आहेत.

हेही वाचा: विद्युत तारांच्या घर्षणाने लागलेल्या आगीत चार दुभत्या गायींचा कोळसा

लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील गर्दी कमी झालेली असली तरी किराणा दुकाने, भाजी, फळ विक्री दुकाने येथे शिस्तीचे पालन केले जात नाही. तसेच सोसायट्यांचे परिसर, वस्ती भाग येथे नागरिक मास्क न घालता, सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन न करणे, अस्वच्छता करणे असे बेशिस्त वर्तन करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने तरुण वर्गाचा समावेश आहे. अशांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभाग व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत कारवाई केली जात असून, मास्क न घातल्यास ५०० रुपये तर, सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन न केल्याने १ हजार रुपयांचा दंड केला जात आहे. पालिकेने निर्बंध आणल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत २२ एप्रिल पर्यंत १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत २५ लाख ७६ हजार ८७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने १५ एप्रिलपासून कडक निर्बंध आणलेले असताना रोज एक लाख पेक्षा जास्त दंड ठोठावण्यात आलेला आहे.

‘‘कामासाठी घराबाहेर पडणारे व्यक्ती नियमांचे पालन करत आहे. पण आपल्याच घराच्या परिसरात सोसायटी, वस्तीमध्ये वावरतना नियमांचे पालन केले जात नाही. यामध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. काही वेळा कारवाई करूनही अशावेळी परस्थितीचे गांभीर्य कळत नाही. त्यासाठी प्रबोधनावरही भर द्यावा लागतो.’’

- जयदीप पवार, सहाय्यक आयुक्त, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय

‘‘कोरोनाची साथ आटोक्यात यावी यासाठी महापालिकेचे सर्वच पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. पण काही नागरिक नियमांचे पालक करत नसल्याने स्वतःसह इतरांना धोका निर्माण करत आहेत. अशांवर कारवाईसाठी मोहीम सुरू आहे. नागरिकांना नियमांचे पालन करून कारवाई टाळावी.’’

- माधव जगताप, उपायुक्त, पुणे महापालिका

हेही वाचा: गावाच्या आरोग्यासाठी धावले नाशिकचे पोलिस उपायुक्त

  • वस्ती, सोसायटी परिसरात नियमांचे जास्त उल्लंघन

  • खेळात मग्न असलेली लहान मुले मास्क काढून टाकतात

  • तरुण मास्क सोबत घेतात, पण तो हनुवटीला लावतात

  • पावती करताना पालिका कर्मचारी व तरुणांमध्ये वादावादी होता

  • मजूर लोकांकडूनही अनावधनाने दुर्लभ होत आहे.

हेही वाचा: 'भारताची चिकाटी आणि सामर्थ्य जाणतो'; कोरोनाविरोधातील लढ्यात ऑस्ट्रेलिया भारतीयांसोबत

तारीख दंडाची रक्कम

४ एप्रिल - १११७९०

५ एप्रिल - १८१०८०

६एप्रिल - १६०९००

७एप्रिल - १२६१६०

८एप्रिल - १३९१८०

९एप्रिल - ३११०८०

१०एप्रिल - १११३००

११एप्रिल - ६९३००

१२एप्रिल - २११९४०

१३एप्रिल - १५१४६०

१४एप्रिल - ९८१२०

१५एप्रिल - १३१०५०

१६एप्रिल - ९१४३०

१७एप्रिल - ५५,६८०

१८एप्रिल - ४६,१००

१९एप्रिल - १७६४४०

२०एप्रिल - १४९४३०

२१एप्रिल - ११३५२०

२२एप्रिल - १४१०००