पुणे जिल्ह्यातील 'या' तीन तालुक्यांच्या दौऱ्यावर जिल्हाधिकारी, सीईओ...

मिलिंद संगई
Saturday, 22 August 2020

खाटांची क्षमता व वापर, स्वॅब नमुना संकलन सुविधा, कर्मचारी ड्यूटी रोस्टर, बायोमेडीकल वेस्ट मॅनेजमेंट, झोन्स, ट्रीटमेंट प्रोटोकॉल व एसओपी, स्वच्छता, पाणीपुरवठा, आहार व्यवस्था, औषधे व साधनसामग्री व्यवस्था, रिपोर्टींग पध्दती, रुग्णवाहिका व्यवस्था यांची तर बारामतीत ऑक्सिजन बेडस, व्हेंटीलेटर्सची व्यवस्था, आयसीयु बेडस, याचीही माहिती ते घेतील. 

बारामती (पुणे) : जिल्ह्याच्या इंदापूर, दौंड व बारामती तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासह मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी प्रशासनाने आता पावले उचलली आहेत. नूतन जिल्हाधिकारी राजेश देशमुख व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आज या तिन्ही तालुक्यांच्या दौ-यावर येत आहेत.

बारामतीतील अधिकारी माध्यमांना माहिती देण्यास करताहेत टाळाटाळ

 
सकाळी देशमुख व आयुष प्रसाद इंदापूर येथील कोविड केअर सेंटर व उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर सणसर येथे भेट देऊन पाहणी होईल. दुपारी दोन वाजता बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयास ते भेट देणार आहेत. दुपारी सव्वाचारच्या सुमारास हे दोन्ही अधिकारी सासवडकडे प्रयाण करणार असून सासवडच्या कोविड केअर सेंटरला ते भेट देतील.  

Video:गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा विशेष लघुपट; तुम्ही पाहिला का?

खाटांची क्षमता व वापर, स्वॅब नमुना संकलन सुविधा, कर्मचारी ड्यूटी रोस्टर, बायोमेडीकल वेस्ट मॅनेजमेंट, झोन्स, ट्रीटमेंट प्रोटोकॉल व एसओपी, स्वच्छता, पाणीपुरवठा, आहार व्यवस्था, औषधे व साधनसामग्री व्यवस्था, रिपोर्टींग पध्दती, रुग्णवाहिका व्यवस्था यांची तर बारामतीत ऑक्सिजन बेडस, व्हेंटीलेटर्सची व्यवस्था, आयसीयु बेडस, याचीही माहिती ते घेतील. 

मेट्रो, पुरंदर विमानतळासह रखडलेली विकासकामे मार्गी लावा- अजित पवार

पहिलाच दौरा....
जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर राजेश देशमुख यांचा जिल्ह्याचा हा पहिलाच दौरा असून यात ते या तिन्ही तालुक्यांची व्यवस्थित माहिती करुन घेतील. काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे. या तिन्ही तालुक्याच्या ठिकाणी प्रमुख अधिका-यांशी ते संवाद साधणार असून कोरोनाशी संबंधित अडचणी दूर करतील. पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बैठक घेत परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना दिल्यानंतर आज तातडीने हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी जिल्ह्याचा दौरा करीत आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collector, CEO will inspect three talukas in Pune district today