'डेक्कन एज्युकेशन सोसायटी'ची महाविद्यालये जूनमध्ये सुरू होणार, पण...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

- पुणे, मुंबई, सांगलीतील सर्व विद्यार्थ्यांसाठी रोज वर्ग
-  लाॅ काॅलेजचे वर्ग २१ मे पासून  सुरू
- मायक्रोसॉफ्ट टीम्सचे विद्यार्थ्यांसाठी लायसन्स

पुणे : कोरोनामुळे १ ऑगस्ट पासून महाविद्यालयांचे नवीन वर्ष सुरू करण्याचे नियोजन असले तरी डेक्कन एज्युकेशन सोसायटीने (डीईएस) पुणे, मुंबई, सांगली येथील सर्व महाविद्यालये १ जून पासून ऑनलाईन पद्धती सुरू करण्याचे नियोजन केले अाहे. तर बुधवारपासून (ता.२१) नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाचे वर्ग सुरू होणार आहेत, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष डाॅ. शरद कुंटे यांनी दिली

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डेक्कन एज्युकेशन सोसायटीने यासंदर्भात माहिती देण्यासाठी झूमद्वारे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी डाॅ. कुंटे यांनी ही माहिती दिली. कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, डीईएसच्या स्थानीय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व विधी महाविद्यालयाचे अॅड. नितीन आपटे, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रोहिणी होनप यावेळी उपस्थित होत्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'कोरोना'ची स्थिती कधी सुधारेल हे माहिती नाही. त्यामुळे संस्थेने लाॅकडाऊन काळात प्री प्रायमरी पासून ते पदव्युत्तर पदवीपर्यंतचे वर्ग सुरू होते. मात्र आता महाविद्यालयीन वर्ग  नियमीत सुरू होणार आहेत. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली येथील कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, नर्सिंग, विधी यासह इतर महाविद्यालयांचा समावेश आहे. सध्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे.  मायक्रोसॉफ्ट टीम्सचे लायसन्सही संस्थेने घेतले आहे, असे कुंटे यांनी सांगितले. 

पुणेकरांनो,तुमच्या समस्या सोडविणार पुणे पोलिस; कसे वाचा सविस्तर

अॅड. नितीन आपटे म्हणाले, "आत्तापर्यंत आम्ही तात्पुरते वर्ग ऑनलाईन घेत होतो, पण विधी महाविद्यालयाचे दुसऱ्या वर्षा पासून पुढचे सर्व वर्ग बुधवारपासून सुरू होत आहेत. एका विषयाचे एक तासाचे लेक्चर असणार आहे, असे सर्व विषय शिकवले जातील. दोन महिने आधी वर्ग सुरू झाल्याने त्याचा फायदा पुढे होईल." 

आता मोलकरणींना कामावर जाता येणार पण...

ऑनलाईन वर्ग सुरू करण्यासाठी आम्ही सर्व प्रकारच्या ऑनलाईन साधनांचा वापर करणार आहोत, त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाहीत, असे प्राचार्या होनप यांनी सांगितले. कुलकर्णी यांनी लाॅकडाऊन काळात विद्यार्थ्यांनी अभ्यासा व्यतरिक्त कोणत्या उपक्रमात सहभाग घेतला याची माहिती दिली.

कोथरुड-कर्वेनगरकर, आता स्वत:ला, कुटुंबाला जपणार अन् कोरोनाला हरविणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Colleges of Deccan Education Society will start online in June