दिलासा! पुणे जिल्ह्यात तीन आकडी कोरोना रुग्णसंख्येची नोंद

शहरात दिवसात १५० नवे रुग्ण
Pune Corona Update
Pune Corona Updatesakal media

पुणे जिल्ह्यातील दिवसातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी (ता.५) पुन्हा एकदा तीन आकडी झाली आहे. जिल्ह्यात आज एकूण ६५८ नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे आठवडाभराच्या खंडानंतर आज पुन्हा एकदा नव्या रुग्णसंख्येचा आकडा एक हजाराच्या आत आला आहे. याआधी २९ जूनला जिल्ह्यात ९४६ रुग्ण आढळून आले होते. आजच्या एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील १५० रुग्ण आहेत. (Comfort three digit corona patients found in Pune district)

शहरात याआधी ३० जूनला एका दिवसात ५०८ तर जिल्ह्यात एकूण १ हजार ४७९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. दरम्यान, जिल्ह्यात आज ८८१ जण कोरोनामुक्त झाले असून अन्य बारा जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूमध्ये पुणे शहर व जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी पाच तर, पिंपरी चिंचवडमधील दोन जणांचा समावेश आहे. नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केले आहे.

Pune Corona Update
कोरोनाचा गरीब महिलांना सर्वाधिक फटका; अभ्यासातील माहिती

आज शहरातील ४ हजार ८४ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी १५० जण बाधित असल्याचे आढळून आले आहे. याउलट २४९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यःस्थितीत पुणे शहरातील १ हजार ९७ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून १ हजार ८८२ जण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. यामुळे शहरातील एकूण क्रियाशील (ॲक्टिव्ह) कोरोना रुग्णांची संख्या २ हजार ९७९ झाली आहे.

आठवड्यातील दिवसनिहाय नवे रुग्ण

दिवस------रुग्णसंख्या

३० जून --- ५०८

१ जुलै --- २८६

२ जुलै --- २६९

३ जुलै --- ३४४

४ जुलै --- ३१६

५ जुलै --- १५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com