...म्हणून लोहगाव एअरपोर्टवरील सुरक्षेत दुप्पट वाढ!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 January 2020

खबरदारीचा उपाय म्हणून शीघ्र कृती दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्‍वान पथक तैनात केले आहे.

पुणे : मंगळूरच्या विमानतळावर तिकीट काऊंटरजवळ स्फोटकांची बॅग सापडल्यामुळे लोहगाव विमानतळावरही सोमवारी (ता.20) दुपारपासून सुरक्षा व्यवस्था दुप्पट करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवरही विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातील विमानतळांची जबाबदारी असणाऱ्या केंद्रीय सुरक्षा औद्योगिक दलातील (सीआयएसएफ) दिल्लीतील अधिकारी 'सकाळ टाईम्स'शी बोलताना म्हणाले, ''मंगळूरच्या घटनेनंतर सर्वच विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्थेत आम्ही वाढ केली आहे. प्रवासी, कर्मचारी यांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

- पुणे : 'डीएसके ड्रिमसिटी'साठी नवीन बिल्डर नेमा; न्यायालयात प्रस्ताव!

तसेच विमानतळाच्या प्रवेशद्वारांवर, पार्किंगमध्येही लक्ष ठेवले आहे.'' खबरदारीचा उपाय म्हणून शीघ्र कृती दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्‍वान पथक तैनात केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

- ...अन् जखमींच्या मदतीला धावले पोलिस आणि आरोपी!

याबाबत विमानतळाचे संचालक अजयकुमार म्हणाले, ''प्रजासत्ताक दिनामुळे विमान कंपन्यांना सुरक्षिततेबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. उड्डाणापूर्वी दोन तास अगोदर प्रवाशांनी उपस्थित राहावे, अशा सूचना त्यांना दिल्या आहेत. विमानतळाजवळही सतर्कतेचा इशारा दिला आहे.''

- अमृता-जितेंद्रचा 'चोरीचा मामला', पोट धरुन हसवणारा ट्रेलर पाहाच !


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Security has increased at Lohegaon Airport on the occasion of Republic day