
पुणे : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी आवश्यक असलेली अद्ययावत साधनसामग्री नसल्याने लॉकडाऊन काळात थंडावलेले ग्राहक मंचाचे कामकाज आता अगदी डिजिटल स्वरूपात सुरू होणार आहे. तक्रारदारांची गर्दी टाळण्यासाठी ग्राहक मंचाने 'कन्झ्युमर कनेक्ट' तसेच 'गो टू मिटींग' या अॅपद्वारे सुनावणीचा निर्णय घेतला आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर अॅपद्वारे तक्रारदारांना कागदपत्रे ऑनलाईन दाखल करून तत्काळ व घरबसल्या न्याय मिळणार आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
प्रायोगिक तत्वावर हे अॅप आयोगाच्या वतीने मुंबईपुरते मर्यादित ठेवण्यात आले होते. मात्र लॉकडाऊन काळात अॅपद्वारे मंचाकडे मोठ्या प्रमाणात ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंचातील गर्दी टाळण्यासाठी आता राज्यभर हा प्रयोग राबविण्यात येत आहे.
- पाऊस डोक्यावर असताना पुण्यातील 900 कुटुंबांच संसार उघड्यावर
'कन्झ्युमर कनेक्ट'च्या माध्यमातून ग्राहकांना स्कॅन केलेली कागदपत्रे घरून अपलोड करता येणार आहे. अपलोड झालेला डेटा राज्य आयोगाला देण्यात येईल. ज्या प्रकरणावर सुनावणी होणार त्याची फाईल स्कॅन केलेली असल्यामुळे ती कागदपत्रे मंचाचे अध्यक्ष व सदस्यांना मोबाईल अथवा संगणकावरून पाहता येतील. ऑनलाईन सुविधेमुळे दाव्या संबंधित सर्व कागदपत्रे सुनावणीसाठी तत्काळ जमा झाल्याने त्यावर जलद गतीने सुनावणी घेता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना 90 दिवसात अन्याय मिळण्याचा नियम आता खऱ्या अर्थाने लागू होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर सोशल डिस्टशिंगचा नियम पाळून मंचाच्या कार्यालयात न येता घरी बसून अध्यक्ष व सदस्यांना मंचाचे कामकाज सुरळीत पार पाडता येणार आहे.
याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे न्याय विधी प्रमुख श्रीकांत जोशी यांनी सांगितले, ऑनलाईन सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. मात्र ती पुरेशा प्रमाणात आणि सक्षम असणेही आवश्यक आहे. त्यात गती आणि सुटसुटीतपणा असावा. त्यातून ग्राहकांना नक्कीच जलद व सोप्या पद्धतीने न्याय मिळेल.
कोरोना निदानाच्या शुल्काला राज्य सरकारने लावली कात्री; चाचणीचे दर निम्म्यावर!
अशी होणार सुनावणी :
प्ले स्टोअरवर कन्झ्युमर कनेक्ट व गो टू मिटींग हे दोन्ही अॅप विनामूल्य उपलब्ध आहे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर सर्वप्रथम तक्रारदारांना लॉगिन करावे लागेल. कन्झ्युमर कनेक्ट अॅपचा वापर हा कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करता येईल. तर, गो टू मिटींगद्वारे तक्रारदाराला सुनावणी साठी हजर राहता येईल. त्यासाठी तक्रारदाराला न्यायमंचाकडून लिंक पाठविण्यात येईल त्यावर क्लिक केल्यास गो टू मिटींग अॅप द्वारे तक्रारदार, वकील, प्रतिवादी सुनावणीसाठी हजर होतील. तक्रार दाखल केल्यानंतर त्याची सुनावणी घ्यायची असल्यास वकील आणि पक्षकारांकडून मंचाला कळविण्यात येईल. त्यानंतर मंच त्या तारखेला सुनावणीसाठी उपलब्ध राहील.
पुण्यातल्या लॉकडाउनचं काय होणार? वाचा व्हायरल मेसेजमागचं सत्य
''वकील व पक्षकारांना ऑनलाईन तक्रारी दाखल करण्याबाबत माहिती देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्यांना ऑनलाईन तक्रार दाखल करायची आहे आणि त्यावर तात्काळ सुनावणी हवी असल्यास ऑनलाईनच्या माध्यमातून ती प्रत्येकाला करता येणार आहे. राज्य आयोगामार्फत आठ दिवसांच्या तारखा देण्यात आल्या आहेत. सोमवारपासून (दि. 15) राज्य आयोगाचे कामकाज ऑनलाईन नियमित सुरू होईल. त्यानुसार वकील, पक्षकारांना घरबसल्या न्यायदानाचे काम पार पडेल''
- अॅड. उमेश जावळीकर, अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच
तुम्हाला येत्या शैक्षणिक वर्षात सीबीएसई अभ्यासक्रम कमी करावा, असे वाटते का? मग 'ही' बातमी वाचा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.