esakal | विश्वजीत कदम म्हणतात, मी सुखरूप
sakal

बोलून बातमी शोधा

Congress MLA Vishwajit Kadam is safe in a vehicle accident in Pune.jpg

बुधवारी रात्री विश्वजीत कदम यांच्या मर्सिडीज कारला मुंबईहून पुण्यात आल्यानंतर अपघात झाला. त्यांच्या रायगड बंगला येथे दुचाकीला वाचविताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. परंतू विश्वजीत यांना सुदैवाने फक्त हाताला मार लागला असून, चालक आणि खासगी सचिव यांना मार लागला नाही, वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

विश्वजीत कदम म्हणतात, मी सुखरूप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्या गाडीला बुधवारी रात्री अपघात झाला. मात्र, या अपघातातून ते सुखरुप बचावले असून, त्यांनी स्वतः मी सुखरुप असल्याचे सांगितले आहे.

काँंग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्या गाडीला अपघात

बुधवारी रात्री विश्वजीत कदम यांच्या मर्सिडीज कारला मुंबईहून पुण्यात आल्यानंतर अपघात झाला. त्यांच्या रायगड बंगला येथे दुचाकीला वाचविताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. परंतू विश्वजीत यांना सुदैवाने फक्त हाताला मार लागला असून, चालक आणि खासगी सचिव यांना मार लागला नाही, वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

माओवादी संबंध प्रकरणातील सहा आरोपींचा जामीन फेटाळला

विश्वजीत कदम यांनी संदेश दिला आहे की,
नमस्कार,

मुंबईहून पुण्याला येत असताना माझ्या गाडीला काल रात्री पुण्यामध्ये गाडी झाडाला धडकल्याने छोटासा अपघात झाला. सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही. मी व ड्रायव्हर दोघेही सुखरूप आहोत. माझ्या डाव्या खांद्याला किरकोळ मार लागला आहे. सर्व वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या असून कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही तसेच कोणताही धोका नाही. साहेबांचे आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छा पाठीशी आहेतच. मी सुखरूप आहे काळजी नसावी!
- आमदार 
डॉ. विश्वजीत कदम

गोळ्या-औषधप्रकरणी कारवाई केव्हा? झेडपी सदस्यांचा प्रशासनाला सवाल

loading image