बारामती नगरपालिकेत या गावांचा समावेश करण्याचा विचार 

मिलिंद संगई
Saturday, 30 May 2020

बारामती नजिक असलेल्या भागांना विविध सोयी सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने या भागातील नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासून हा भाग नगरपालिकेत समाविष्ट करावा, अशी मागणी होती. आ

बारामती (पुणे) : बारामती शहरालगत असलेली मेडद व मळद या दोन छोट्या गावांचा समावेश बारामती नगरपालिकेच्या हद्दीत करण्याबाबत आज चर्चा झाली. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मेडद, बांदलवाडी व मळद या दोन ठिकाणी भेट देत पाहणी केली. त्या नंतर अधिकाऱ्यांना याबाबत काय नेमके करता येईल, याचा प्रस्ताव तयार करून पाठवावा, अशी सूचना अजित पवार यांनी केली. आज बारामती भेटीदरम्यान अजित पवार यांनी विविध विकासकामांच्या दृष्टीने पाहणी केली. अधिका-यांना त्यांनी याबाबत सूचना केल्या. 

दोघी बहिणींची भटकंती निसर्गसेवेसाठी

बारामती नजिक असलेल्या भागांना विविध सोयी सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने या भागातील नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासून हा भाग नगरपालिकेत समाविष्ट करावा, अशी मागणी होती. आज सामाजिक कार्यकर्ते दिलीप शिंदे यांनीही याबाबत अजित पवार यांच्याकडे मागणी केली. नगरपालिकेतील गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर हेही या प्रसंगी उपस्थित होते. मुख्याधिकारी योगेश कडुसकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांच्यासह कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, विश्वास ओहोळ हेही उपस्थित होते. 

अक्षय बोऱ्हाडे यांचा प्रवास : सायबर कॅफेतील कामगार ते सामाजिक कार्यकर्ता

या भागातील विविध कामे मार्गी लावण्यासाठी हा भाग नगरपालिकेच्या हद्दीत आला तर त्याचा फायदा होईल, ही बाब लक्षात आल्याने अजित पवार यांनीही याबाबतचा प्रस्ताव तयार करुन पाठविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या पूर्वीही नगरपालिकेत तांदुळवाडी, रुई, जळोची व बारामती ग्रामीण या भागाचा समावेश बारामती नगरपालिकेत करण्यात आला आहे. 

भीतीची छाया आणि त्यातही पुणेकरांसाठी आली गुड न्यूज

लोकसंख्येच्या निकषानुसार बारामती नगरपालिकेचा समावेश अ वर्गात झाला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये बारामती ही एकमेव नगरपालिका अ वर्गाची आहे. सन 1865 मध्ये बारामती नगरपालिकेची स्थापना इंग्रजांनी केली होती. त्यानंतर हद्दवाढ होऊन चार भागांचा समावेश केला गेला. आता परत एकदा नगरपालिकेची हद्दवाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आसपासच्या लोकांचा फायदा होणार असून, भुयारी गटार, पथदिवे, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता या सारख्या सुविधा या परिसरातील नागरिकांनाही मिळतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Consideration to include these villages in Baramati Municipality