कोरोना विरोधात लढण्यासाठी भारतीय हवाईदलाचे कार्य सुरूच 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

गेल्या काही दिवसांमध्ये वायुदलाने ईशान्य भारतात औषधे पोहोचविण्याचे कार्य केले होते. तसेच कोविड 19 च्या चाचणीसाठी ओडिशामध्ये उभारण्यात येत असलेल्या प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या तज्ज्ञांची तुकडी व सुमारे तीन हजार 500 किलोचे वैद्यकीय संसाधने वायुदलाच्या 'एएन - 32' या विमानाने चेन्नईतील आयसीएमार मधून भुवनेश्वर पर्यंत पोहोचविण्यात आले. 

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून देशातील विविध राज्यांमध्ये वैद्यकीय सुविधा आणि यंत्रणांच्या मागणी सुद्धा वाढत आहेत. दरम्यान भारतीय हवाईदला (आयएएफ) तर्फे सातत्याने या सर्व संसाधनांचा पुरवठा केला जात आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या काही दिवसांमध्ये वायुदलाने ईशान्य भारतात औषधे पोहोचविण्याचे कार्य केले होते. तसेच कोविड 19 च्या चाचणीसाठी ओडिशामध्ये उभारण्यात येत असलेल्या प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या तज्ज्ञांची तुकडी व सुमारे तीन हजार 500 किलोचे वैद्यकीय संसाधने वायुदलाच्या 'एएन - 32' या विमानाने चेन्नईतील आयसीएमार मधून भुवनेश्वर पर्यंत पोहोचविण्यात आले. 

Coronavirus: कोरोनाबाधित वाढताहेत, घराबाहेर पडू नका

वायुदलाच्या वतीने गरज पडल्यास विविध वैद्यकीय सुविधांना पुरविण्यासाठी काही केंद्रस्थानांवर आपले विमान सज्ज ठेवले आहेत. 

बारामतीत दोन लहान मुलींना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांची संख्या...​

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Constantly demand of medical facilities and equipment resources are supplied by IAF