सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार; गृहनिर्माणच्या निवडणुकांबाबत निर्णय नाही

अनिल सावळे 
Tuesday, 12 January 2021

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी याबाबतचे आदेश मंगळवारी (ता. 12) जारी केले.

पुणे : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. राज्य सरकारने सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया स्थगित केल्याचा आदेश संपुष्टात आल्यामुळे निवडणुका ज्या टप्प्यावर स्थगित असतील त्या टप्प्यापासून ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. मात्र, अडीचशे आणि त्यापेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळण्यात आल्या असून, त्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. 

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी याबाबतचे आदेश मंगळवारी (ता. 12) जारी केले. राज्य सरकारने कोरोनाच्या संसर्गामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबर 2020 पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. हा आदेश संपुष्टात आल्यामुळे निवडणुका होणार की मुदतवाढ मिळणार, याबाबत निर्णय होणे अपेक्षित होते. राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकललेला कालावधी संपुष्टात आल्यापासून सहा महिन्यांत पात्र सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्‍यक आहे. त्यानुसार प्राधिकरणाने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

उर्दू प्रेमींसाठी आनंदाची बातमी; पुणे विद्यापीठानं सुरू केला डिप्लोमा कोर्स!​

डिसेंबर 2020 अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या सुमारे 45 हजार सहकारी संस्थांची निवडणूक घेण्यात येईल. 18 जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी "जिल्हा निवडणूक आराखडा' तयार करण्याच्या सूचना जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडताना सामाजिक अंतर राखण्यात यावे. मास्कचा वापर, सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रीनींग उपाययोजनांचा अवलंब करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

Breaking: काँक्रिट मशिनचा धक्का लागल्याने पुण्यात तरुणाचा जागीच मृत्यू; बाजीराव रोडवरील घटना​

गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकाही लवकरच 
अडीचशेपेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्थाबाबत अद्याप निवडणूक नियमावली जारी केलेली नाही. राज्य सरकारकडून नियमावली दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. उर्वरित सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे नियमावली येताच गृहनिर्माण संस्थांच्याही निवडणुकांना परवानगी मिळेल, अशी अपेक्षा आहे. 

Bird Flu: महाराष्ट्रात थैमान; दोन जिल्ह्यातील साडेसहा हजार कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश​

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना परवानगी दिली असून, पहिला टप्पा जाहीर केला आहे. सहा टप्प्यांत या निवडणुका घेण्यात येतील. अडीचशेपेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांसाठी नियमावली आल्यानंतर त्याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल. 
- यशवंत गिरी, सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cooperative societies elections finally announced