esakal | कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

Money

कोरोनाने मृत्यू झालेल्या जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या कुटुंबीयांच्या मदतीला इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी धावून आली आहे. यानुसार शिक्षक पतसंस्थेने त्यांच्या शिक्षक कल्याण निधीतून या दिवंगत शिक्षकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. या मदतीचे धनादेश बुधवारी (ता. 30) संबंधित शिक्षकांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाने मृत्यू झालेल्या जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या कुटुंबीयांच्या मदतीला इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी धावून आली आहे. यानुसार शिक्षक पतसंस्थेने त्यांच्या शिक्षक कल्याण निधीतून या दिवंगत शिक्षकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. या मदतीचे धनादेश बुधवारी (ता. 30) संबंधित शिक्षकांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांतील तीन आणि माध्यमिक शाळांमधील दोन अशा एकूण पाच शिक्षकांचा कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू होऊन सुमारे महिनाभराचा कालावधी लोटून गेला तरीही, या शिक्षकांच्या कुटुंबीयांना सरकार किंवा जिल्हा परिषद प्रशासनाकडून काहीच आर्थिक मदत मिळाली नव्हती. एवढेच नव्हे, या कुटुंबीयांचे साधे सांत्वन करण्याचे सौजन्यही जिल्हा प्रशासनाने दाखवले नव्हते.

नानासाहेब पेशव्यांच्या राजकीय, लष्करी हालचालींचा वेध 

याबाबतचे वृत्त सकाळने 28 सप्टेंबर रोजी "सांगा,आम्ही जगायंचं कसं' या शीर्षकाखाली प्रसिद्ध केले होते. इंदापूर तालुक्‍यातील संतोष खुटाळे व सोपान कांबळे या दोन प्राथमिक शिक्षकांचे कोरोनाने निधन झाले आहे. पतसंस्थेच्यावतीने सभापती संतोष वाघ, उपसभापती वसंत फलफले, माजी सभापती किरण म्हेत्रे, संभाजी काळे आदींसह संचालक मंडळाने संतोष खुटाळे यांच्या पत्नी सविता खुटाळे आणि सोपान कांबळे यांच्या पत्नी सुवर्णा कांबळे यांना त्यांच्या घरी जाऊन आज प्रत्येकी 10 लाख रुपयांचा धनादेश दिला.

बारामतीकरांची दंड आकारूनही सवय काही जाईना; बेशिस्त वाहन चालकांकडून पाच महिन्यांत 35 लाख वसूल 

यावेळी माजी सभापती सुनील शिंदे, विलास शिंदे, दत्तात्रेय ठोंबरे, संचालक आदिनाथ धायगुडे, बालाजी कलवले, तज्ज्ञ संचालक सुनील चव्हाण, सचिव संजय लोहार, माजी तज्ज्ञ संचालक भारत ननवरे, शिक्षक समितीचे नेते मोहन भगत, प्रवीण धाईंजे, प्रताप शिरसट, सयाजी येवले,सदाशिव रणदिवे आदी उपस्थित होते.

Edited By - Prashant Patil