इंदापूरकरांनो सावधान, या गावामध्ये आढळलाय कोरोनाचा रुग्ण

राजकुमार थोरात
Thursday, 25 June 2020

संबधित युवक उपचारासाठी मुंबई ला ये-जा करीत आहे. तो तीन दिवसांपूर्वीच मुंबईला गेला असून, टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्येच उपचार घेत आहे.

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील जंक्शनमधील ३० वर्षीय युवकाला कोरोनाची लागन झाली असून, संबधित युवक उपचारासाठी मुंबई ला ये-जा करीत आहे. तो तीन दिवसांपूर्वीच मुंबईला गेला असून, टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्येच उपचार घेत आहे.

मंगल कार्यालयात पुन्हा घुमणार सनईचे सूर

इंदापूरच्या पश्‍चिम भागातील जंक्शन हे गाव मिनी एमआयडीसी म्हणून ओळखले जाते. येथे अनेक लघू उद्योग असून, छोटे वर्कशाॅप आहेत. येथील ३० वर्षाच्या युवकाला गंभीर आजाराने ग्रासले असून, गेल्या अनेक दिवसापासून हा युवक उपचारासाठी मुंबईला ये-जा करीत होता. तीन दिवसांपूर्वी तो उपचारासाठी मुंबईला गेला आहे. सध्या हा युवक मुंबईमधील टाटा मेमोरियल रुग्णालयामध्ये उपचारासाठी अॅडमिट आहे. त्याची तपासणी केली असताना कोरानाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

या युवकाची गणना मुंबईच्या रुग्णामध्ये करायीच की,इंदापूरच्या याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जंक्शनचा परिसर सील करण्यास सुरवात करण्यात आली आहे. तसेच, आरोग्य विभागाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरु आहे. 

पडळकर यांच्याविरूद्ध बारामतीत गुन्हा दाखल

या युवकाच्या संपर्कामध्ये जंक्शनजवळील साईनगरमधील पाचजण आले होते. यामध्ये कुटुंबातील चौघे जण असून, एका चालकाचा समावेश आहे. पाचही नागरिकांचे घशातील नमुने घेण्यासाठी तातडीने इंदापूरला पाठविण्यात आले असल्याची माहिती इंदापूर तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ व लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जीवन सरतापे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient found in Indapur taluka