esakal | कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला; "टॉप थ्री'मधील आरोपीला दुबई पोलिसांकडून अटक 

बोलून बातमी शोधा

cosmos bank cyber attack top three accused Dubai police arrest one }

सायबर गुन्हेगारांनी डार्क वेबवरुन कॉसमॉस बॅंकेच्या ग्राहकांची गोपनीय इलेक्‍ट्रॉनिक माहिती चोरली.

कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला; "टॉप थ्री'मधील आरोपीला दुबई पोलिसांकडून अटक 
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

पुणे - कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला घडवून तब्बल 94 कोटी रुपये लुटणाऱ्या "टॉप थ्री' आरोपींपैकी एका आरोपीस संयुक्त अरब अमिराती (युएई) पोलिसांनी अटक केली आहे. संबंधीत आरोपीच्या अटकेमुळे कॉसमॉस सायबर हल्ल्याच्या "मास्टरमाईंड' पर्यंत पोचण्यास पुणे पोलिसांना मदत होणार आहे. दरम्यान, पुणे पोलिसांकडून संबंधीत आरोपीच्या प्रत्यार्पणासाठी केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून "युएई' पोलिसांकडे पाठपुरावा करण्यात आला असून त्यास प्रतिसादही मिळाला आहे.

सुमेर शेख (वय 28, रा.मुंबई, सध्या दुबई) असे "युएई' पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सायबर गुन्हेगारांनी 11 व 13 ऑगस्ट 2018 मध्ये कॉसमॉस बॅंकेच्या एटीएम स्वीचवर सायबर हल्ला चढवून टोळ्यांकडे दिलेल्या बनावट एटीएम कार्डचा वापर करुन तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये इतकी रक्कम काढून घेतली होती.

पुणे ZPच्या 56 जणांच्या दिव्यांग दाखल्यांची ससूनमध्ये फेर तपासणी

राजस्थानमधील अजमेर येथे दोन आरोपींनी 16 बनावट कार्डद्वारे पावणे अकरा लाख रुपये काढले, तर कोल्हापुरमध्ये 101 बनावट कार्डचा वापर करुन 31 बॅंकांच्या 52 एटीएममधून 89 लाख 57 हजार रुपये काढले. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, सायबर गुन्हे शाखेने पुण्यासह कोल्हापुर, अजमेर येथील एटीएममधून काढलेले साडे सहा लाख रुपये परत मिळविले. कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने आत्तापर्यंत 12 ते 13 आरोपींना अटक केले आहे. आरोपींविरुद्ध 1750 पानांचे दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.

  धोक्याची घंटा! दर महिन्याला ९ अल्पवयीन मुलींचा गर्भपात...

सायबर गुन्हेगारांनी डार्क वेबवरुन कॉसमॉस बॅंकेच्या ग्राहकांची गोपनीय इलेक्‍ट्रॉनिक माहिती चोरली. याच माहितीचा वापर करुन बनावट एटीएम कार्ड बनविले. दरम्यान बनावट कार्ड वापरात आणण्यासाठी एक दिवस आगोदर बॅंकेचे एटीएम स्वीच सर्व्हर हॅक करण्यात आला होता. सायबर हल्ला केल्यानंतर तो पैसा घेण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी देश-परदेशात टोळ्या बनविल्या होत्या. त्यांच्या माध्यमातून पैसे काढून घेतले. तर हॉंगकॉंगच्या हेनसेंग बॅंकेमध्ये आरोपींनी 11 ते 12 कोटी रुपये पाठविले होते. त्यापैकी सहा कोटी रुपये परत मिळविण्यात पुणे पोलिसांना यश आले.

खुशखबर! एक रुपयात मिळणार भरड धान्य, 'या' कुटुंबांना मिळणार लाभ

दरम्यान, या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी 12 ते 13 जणांना अटक केली होती. मात्र या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एका आरोपींचा सायबर गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या पथकाने नेपाळच्या सीमारेषेपर्यंत पाठलाग केला. मात्र तेथून आरोपी निसटण्यात यशस्वी झाला होता. संबंधीत आरोपी पाकीस्तान मार्गे दुबईला गेला होता. हा आरोपी सुमेर शेख असण्याची शक्‍यता आहे. 

सोनं खरेदी करण्याचा गोल्डन चान्स ते आमच्या पुण्यात सगळंच भारी; वाचा एका क्लिकवर​

असा आहे, सुमेर शेखची भुमिका -
कॉसमॉस बॅंकेवरील सायबर हल्ला करण्यामध्ये सुमेर शेखची महत्वाची भुमिका आहे. त्यानेच या हल्ल्याचे पुर्णपणे नियोजन करून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली असण्याची दाट शक्‍यता आहे. डार्कवेबवरून बॅंकेच्या ग्राहकांचा डेटा विकणे किंवा विकत घेणे, बनावट डेबीट कार्ड बनविणे, टोळी तयार करून त्यांना बनावट डेबीट कार्ड पुरविणे आणि हल्ला घडविल्यानंतर त्यांच्याकडून पैसे घेणे, अशा पद्धतीची त्याने भुमिका बजावली असण्याची शक्‍यता आहे. 

मोठी बातमी : गजा मारणे आणि साथीदारांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला​

* रेड कॉर्नर नोटीसमुळे शेख "युएई' पोलिसांच्या जाळ्यात 
कॉसमॉस बॅंक सायबर हल्ल्यातील प्रमुख आरोपींपैकी सुमेर शेख हा एक आरोपी आहे. त्यामुळे इंटरपोलच्या माध्यमातून त्याच्याबाबत रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे 28 देशांचे पोलिसही सतर्क झाले होते. त्यादृष्टीने "युएई' पोलिस तपास करत असताना शेख त्यांच्या जाळ्यात अडकला. 
------ 
""कॉसमॉसवरील सायबर हल्ल्यातील प्रमुख तीन आरोपींपैकी एक सुमेर शेख हा आहे. त्यास "युएई' पोलिसांनी अटक केली आहे. शेखचा ताबा पुणे पोलिसांना मिळावा, यासाठी भारतीय तपास संस्थांच्या माध्यमातून आम्ही "युएई' पोलिसांशी संपर्क साधला आहे. त्यास त्यांचा प्रतिसाद मिळाला आहे.'' डॉ.शिवाजी पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा. 
--------------