परीक्षेचे टेंशन कसले घेता बिनधास्त बोला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

  • 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशक

पुणे : 10वी, 12वीची परीक्षा जशी जशी जवळ येतेय तसे विद्यार्थ्यांची धडधड वाढते. काही विद्यार्थी परीक्षेच्या विचाराने नैरश्‍य येते. या विद्यार्थांना सकारात्मक विचार यावेत, अभ्यासात लक्ष लागावे यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यस्तरीय समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत समुपदेशक उपलब्ध असणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिक्षण मंडळातर्फे 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधी 12वी तर 3 मार्च ते 23 मार्च या दरम्यान इयत्ता 10वीची परीक्षा पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागांमध्ये होणार आहे. त्याचे वेळापत्रकही यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.

पुण्यात मानसी नाईकचा विनयभंग

परीक्षेच्या काळात अभ्यास होत नाही, अभ्यास केलेले लक्षात रहात नाही, पेपर सोपा जाणार का, चांगले गुण मिळणार का? यासह अनेक विचारांनी विद्यार्थी मानसिक दडपणाखाली येतात. त्यातून काही विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलून आयुष्य संपवतात.

पुण्यातील गोल्ड जिमला ग्राहक मंचाचा दणका

विद्यार्थ्यांच्या मनातील नकारात्मकता कमी व्हावी, सकारात्मक विचाराने परीक्षेला सामोरे जावे यासाठी राज्य शिक्षण मंडळाने ऑनलाईन समुपदेशनासाठी समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. या तज्ज्ञांना सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत विद्यार्थांनी फोन करता येईल. समुपदेशकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी दिलेल्या सूचना, दूर केलेल गैरसमज यातून विद्यार्थ्यांचे नैराश्‍य कमी होऊन उत्साहाने पुन्हा अभ्यासाला लागू शकतात. मात्र, समुपदेशकांशी चर्चा करताना विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था, प्रश्‍नपत्रीकेतील प्रश्‍न याबाबत समुपदेशकाकडे चौकशी करू नये असे आवाहन सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

या क्रमांकावर संपर्क साधावा
समुपदेशनासाठी विद्यार्थी, पालकांनी 8421741931, 7249005260, 9619248229, 9356056300, 9766698537, 9987318490, 9673121535, 9930638165, 7387501892, 9356089569 या क्रमांकावर संपर्क साधावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Counselor for 10th, 12th students Education Board