उपजिल्हाधिकाऱ्याविरुद्ध न्यायालयाकडून पकड वॉरंटचा आदेश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

​वीस वर्षांपुर्वी पुणे व पिंपरी शहरात नागरी कमाल जमीन धारणा कायद्याखालील जमीनींबाबत अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिकांशी संगनमत करुन बनावट आदेश तयार करुन शासनाची फसवणूक केली होती. याप्रकरणी सुनावणी दरम्यान उपस्थित राहण्याबाबत मुभा देण्यात यावी, यासाठी कुंदेटकर यांनी न्यायालयात वकीलांमार्फत अर्ज दाखल केला होता. या अर्जाला विशेष सरकारी वकील विजय सावंत यांनी विरोध दर्शविला होता.

पुणे : नागरी कमाल जमीनधारणा कायद्यातील जमीनींबाबत खोटे आदेश काढून अपहरण केल्याप्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्याविरुद्ध विशेष न्यायाधीश एस.एच.ग्वालाणी यांनी पकड वॉरंट काढण्याचा आदेश दिला. 

चालकाला शंका आल्याने एसटी बस बाजुला घेतली अन्....
 

संजय कुंदेटकर असे उपजिल्हाधिकाऱ्याचे नाव आहे. पिंपरी येथील जमीनबाबतचा 2010 मधील हा खटला आहे. त्यामध्ये एकूण नऊ आरोपी आहेत. या खटल्यातील आरोपींनी अनेकदा उच्च, सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणी आत्तापर्यंत दोषारोपपत्र दाखल होऊ शकले नाही.

पुण्यात चालत्या एसटीने घेतला पेट, बस जळून खाक; एकदा व्हिडिओ पाहाच

वीस वर्षांपुर्वी पुणे व पिंपरी शहरात नागरी कमाल जमीन धारणा कायद्याखालील जमीनींबाबत अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिकांशी संगनमत करुन बनावट आदेश तयार करुन शासनाची फसवणूक केली होती. याप्रकरणी सुनावणी दरम्यान उपस्थित राहण्याबाबत मुभा देण्यात यावी, यासाठी कुंदेटकर यांनी न्यायालयात वकीलांमार्फत अर्ज दाखल केला होता. या अर्जाला विशेष सरकारी वकील विजय सावंत यांनी विरोध दर्शविला होता. या खटल्यातील आरोपींतर्फे आतापर्यंत वेगवेगळी कारणे सांगून खटला लांबविण्याचा प्रयत्न झाला आहे.

Video : पोलिसांमधील कलाकारांनी केली छत्रपतींवरील महाआरतीची निर्मिती

दोषारोपपत्र दाखल होऊ नये, यासाठी न्यायालयात हजर न राहता वेळकाढूपणा केला जात आहे. या प्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल होण्यासाठी कुंदेटकर यांनी न्यायालयात हजर करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तीवात ऍड.सावंत यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून कुंदेटकरविरुद्ध पकड वॉरंट जारी केले आहे.

फास्टॅग वाहनांसाठी वेगळी मार्गिका (लेन) नसल्याने वाहनांच्या रांगा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Court orders arrest warrant against the District Magistrate