
कोविशिल्ड ओमिक्रॉनविरोधात लढण्यास कमकुवत; बुस्टर डोस आवश्यक - NIV
पुणे : कोरोना विषाणूविरोधात लशींच्या प्रभावाबाबत झालेल्या एका अभ्यासातून हे समोर आलंय की, कोविशिल्ड लस ओमिक्रॉन व्हेरियंटविरोधात लढण्यात कुमकुवत झाली आहे. बरे झालेले रुग्ण आणि दोन डोस घेतलेल्या व्यक्ती यांच्या तुलनेतून हे समोर आलं आहे. त्यामुळं कोरोनाचा प्रभाव थोपवण्यासाठी बुस्टर डोस आवश्यक आहे, असं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीनं (NIV) म्हटलं आहे. (Covishield too found weak against Omicron boosters important NIV)
हेही वाचा: राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार नाही - देवेंद्र फडणवीस
अशाच प्रकारच्या आणखी एका अभ्यासात असं आढळून आलंय की, कोव्हॅक्सिन लसीतून देखील ओमिक्रॉनविरोधात मर्यादित संरक्षण मिळू शकतं. विषाणूच्या म्युटेशनमुळं हे घडत असल्याचंही यातून समोर आलंय. ICMR च्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या (ICMR-NIV) तज्ज्ञांनी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींबाबत संशोधन केलं आहे. यामुळं लोक पात्र झाल्यानंतर बुस्टर डोस लवकरात लवकर घेण्यात यावा अशी शिफारसही या संस्थेनं केली आहे.
हेही वाचा: अजित पवार म्हणाले, कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी गृहखात्याची
कोविशिल्डच्या अभ्यासात असं आढळून आलंय की, बरे झालेल्या रूग्णांच्या सीरमच्या तुलनेत किंवा ज्यांना संसर्ग झालाय अशा व्यक्तीच्या तुलनेत लसीकरण केलेल्या व्यक्तींच्या सीरममध्ये ओमिक्रॉन विरूद्ध ऍन्टीबॉडीज टिकवून ठेवण्यासाठी कमी प्रभावशील असल्याचं दिसून आलं आहे.
Web Title: Covishield Too Found Weak Against Omicron Boosters Important Niv
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..