पुणे : पंतप्रधान मोदींमुळे खडकीतील फटाका विक्री दोन दिवस बंद

PM-Narendra-Modi
PM-Narendra-Modi

खडकी बाजार : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर गुरूवारी ( ता.17) सभा असल्यामुळे पुण्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. खडकी पोलिसांनी खडकीतील अधिकृत फटाका स्टॉल विक्रेत्यांना दोन दिवस फटाका विक्री बंद ठेवा, कोणताही विक्रेता दुकानात बसलेला दिसता कामा नये, अशी पोलिसी खाक्यात तंबी मिळाल्याने फटाका विक्रेत्यांनी खडकीतील सर्व फटाका स्टॉल बंद ठेवण्यात आले होते.

खडकी येथील एसीपी मैदानावर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे लिलावाद्वारे फटाका स्टॉल विक्रेत्यांना देण्यात आले आहेत. त्याचा वीज, मांडव आणि इतर खर्च विचारात घेता प्रत्येक स्टॉल धारकाला मोठी रक्कम मोजावी लागते. दहा-पंधरा दिवसच फटाका विक्री होत असते. त्यामुळे विक्रेत्यांजवळ बोटांवर मोजण्याइतकेच दिवस असतात. त्यातच मोदींच्या सभेमुळे दोन दिवस दुकान बंद ठेवण्याच्या आदेशामुळे येथील विक्रेत्यांचे लाखोंचे नुकसान होत असल्याचे येथील फटाका विक्रेत्यांनी सांगितले.

दुसरीकडे बॉम्ब शोधक पथक आणि खडकी पोलिस ठाण्यातील पोलिसांनी खबरदारी म्हणून दुकान चालू न ठेवण्याच्या सूचना दुकानदारांना दिल्या आणि दुकानदारांकडे पोलिसांची परवानगी नसल्याचेही कारण पुढे ढकलले आहे. एक-दोन दिवसांत पोलिस परवानगीचे काम पूर्ण होईल, असे खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भागवत मिसाळ सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com