esakal | मोबाईल नेटवर्कचे बेसबॅंड चोरणाऱ्यांना पोलिसांनी केलं जेरबंद; ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Crime_Arrest

बेस बॅंड, रुस कार्ड आणि इतर साहित्य भंगार विक्रेत्याला विकल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाईल नेटवर्कचे बेसबॅंड चोरणाऱ्यांना पोलिसांनी केलं जेरबंद; ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मोबाईल टॉवरवरील ३ जी आणि ४ जी नेटवर्क कव्हरेज करणारे बेस बॅंड चोरणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ६१ लाख १५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुफरान लतीब राज ऊर्फ बाबा (वय ४० वर्षे रा. हडपसर, मूळ रा. रायगड), महेश हनुमंत परीट (वय २४ वर्षे रा. चिंतामणी नगर, मूळ रा. सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

मास्कविना फिरणाऱ्यांनो, आता चौपट दंड होणार; दिल्लीची कोरोनाची स्थिती गंभीर!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक ए. डी. पिंगळे यांना बुधवारी खबर मिळाली की, मोबाईल टॉवरवरील वस्तू चोरी करणारे दोन चोरटे दुचाकी घेऊन स्वारगेट एसटी स्थानकाजवळील कॅनॉलचे शेजारून जाणारे रस्त्यावर थांबलेले आहेत. माहितीची खात्री होताच ते पोलिस सहकाऱ्यांबरोबर त्या ठिकाणी गेले. आरोपींना ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे सुफरान आणि महेश अशी असल्याचे सांगितले. त्यांना ताब्यात घेऊन चोरीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी मोबाईल टॉवरवरील बेस बॅंडची चोरी केल्याचे कबूल केले. बेस बॅंड, रुस कार्ड आणि इतर साहित्य भंगार विक्रेत्याला विकल्याचे त्यांनी सांगितले.

'नितीशजी, खरे गुन्हेगार तर तुम्ही आहात'; तेजस्वीने चढवला हल्ला

भंगार विक्रेता समीरउल्ला अजीमउल्ला शहा (रा.सय्यदनगर, हडपसर) याच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल टॉवरवरील 3 जी, 4 जी नेटवर्क कव्हरेज कंट्रोल करणारे 6 बेस बॅंड, 11 रुस कार्ड, 2 टीआरएक्‍स असा 60 लाख रुपयांचा माल तसेच गुन्हा करण्यासाठी आरोपींनी वापरलेल्या दोन दुचाकी असा सर्व मिळून 61 लाख 15 हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. भंगार दुकानदार याने चोरीचा माल खरेदी केल्यामुळे त्यास या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

लग्न करताय का? मग ही बातमी नक्की वाचाच!​

पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, उपनिरीक्षक आनंद पिंगळे, सहायक फौजदार यशवंत आंब्रो, पोलिस अंमलदार किशोर वग्गु, विशाल भिलारे, चेतन गोरे, चंद्रकांत महाजन, अजित फरांदे, निखिल जाधव, कादीर शेख यांनी ही कारवाई केली आहे. 

११ गुन्हे उघडकीस : 
अटक आरोपींकडून आतापर्यंत भारती विद्यापीठाचे दोन, चिखली, विमाननगर, लोणीकंद, शिक्रापूर, शिरूर, दौंड, लोणीकाळभोर आणि वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ११ गुन्हे उघडकीस आणले आहे. तिघांना 23 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top