खळबळजनक : पुण्यात माहिती अधिकार कार्यकर्ता व पत्रकाराविरुद्ध खंडणीचा गुन्हा 

crime.jpg
crime.jpg

पुणे :  जमीन व दोन कोटी रूपयांच्या खंडणीसाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करुन बांधकाम व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका महिलेसह माहिती अधिकार कार्यकता रविंद्र बऱ्हाटे, बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, पत्रकार देवेंद्र जैन व अमोल चव्हाण अशा पाच जणांविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता व पत्रकार यांच्याविरुद्ध खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली. 

याप्रकरणी सुधीर कर्नाटकी (वय 64,पौड रोड, कोथरूड) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन दीप्ती अनिल आहेर (रा. बावधन, कोथरुड), रविंद्र लक्ष्मण बऱ्हाटे (रा. लुल्लानगर, कोंढवा), शैलेश हरिभाऊ जगताप (रा. भवानी पेठ), अमोल सतीश चव्हाण (रा. चव्हाणवाडा, कोथरुड) व देवेंद्र फूलचंद जैन (सिंहगड रोड, कोथरुड) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध जिवे मारण्याची धमकी देत खंडणी मागणे, संगनमत करुन कट रचणे, धमकाविणे अशा प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्नाटकी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी कर्नाटकी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची 2007 मध्ये दीप्ती आहेर हिच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री वाढली. 2013 मध्ये आहेर हिने फिर्यादीकडे ती तिच्या कुटुंबासह कसबा पेठेत राहत आहे, मात्र तेथील घर छोटे पडत असल्याने फिर्यादीच्या ओळखीने भाडयाने मोठे घर मिळवुन देण्याचा आग्रह धरला. त्यावेळी फिर्यादीने त्यांच्या ओळखीने बावधन येथे तीन बेडरुमची मोठी सदनिका तिला मिळवून दिली. त्याचे भाडे फिर्यादी स्वत: भरत होते. त्यानंतर 2017 मध्ये संबंधीत सदनिका दोघानी संयुक्तपणे खरेदी करुन दोघांच्या नावावर केली. सदनिकेचे बॅंकेचे हफ्ते फिर्यादी भरत होते.

दरम्यान, 2019 पासून आहेर ही फिर्यादीकडे पैशांची अवास्तव मागणी करु लागली. वेळोवेळी फिर्यादीवर खोटे आरोप करुन गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती. नोव्हेंबर 2019 मध्ये फिर्यादी आहेर ही रविंद्र बऱ्हाटे, शैलेश जगताप, अमोल चव्हाण व देवेंद्र जैन यांना घेऊन आली. त्यावेळी तिने फिर्यादीला बावधनमधील सदनिका व सहा लाख रूपये द्या, अन्यथा खोटा गुन्हा दाखल करेल, सुपारी देऊन जिवे मारण्याची धमकी दिली. पैसे नसल्यास स्टम्प पेपरवर लिहुन देत तडजोड करण्याची मागणी केली. त्यावेळी बऱ्हाटे हा माहिती अधिकार कार्यकर्ता असून त्याचे राजकीय लोकांशी संबंध असल्याचे, शैलेश जगताप हा पोलिस असून, तो कोणताही गुन्हा दाखल करु शकतो, अमोल चव्हाण हा वसूली करत असल्याने तो गुंड प्रवृत्तीचा आहे, तर देवेंद्र जैन हा पत्रकार आहेत, असे सांगून तिने फिर्यादीला धमकी दिली. बऱ्हाटेने सांगितल्याप्रमाणे आहेरने फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध त्यांनी सांगितल्याप्रमाणे सदनिका व 6 लाख रूपये देण्याचा करारनामा करुन घेतला.

दरम्यान, 26 डिसेंबर 2019 रोजी फिर्यादी हे खरेदीसाठी बाहर गेले असताना आहेर हिने त्यांना गाठुन दोन कोटी रूपये व रास्ता पेठेतील जमीन देण्याची मागणी केली. तसेच जैन हा पत्रकार असल्याने फिर्यादीविरुद्ध सगळीकडे बातम्या देऊन बदनामी करू असे सांगितले. तसेच पुन्हा एकदा रविंद्र बऱ्हाटे व शैलेश जगतापचा पोलिसात खुप वट असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तर 10 जानेवारी 2020 या दिवशी जैन याने फिर्यादीस त्याच्या कार्यालयात बोलावून पुन्हा तीच मागणी केली. फिर्यादी यांनी त्यांच्या धमक्यांना प्रतिसाद न दिल्यामुळे आहेर हिने तिच्या साथीदारांशी संगनमताने कट रचुन फिर्यादीविरुद्ध हिंजवडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. फिर्यादी यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर व लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर त्यांनी फिर्याद दाखल केली.

हिंजवडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. कर्नाटकी हे या प्रकरणात जामीनावर बाहेर असून त्यांनी हे प्रकरण मिटविण्यासाठी माझे अशिल दीप्ती आहेर व अमोल चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा खोटा असल्याचे आम्ही न्यायालयात सिद्ध करू.-विजयसिंह ठोंबरे, दीप्ती आहेर हिचे वकील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com