पोलिसांकडून अवैध धंद्यांची ‘सफाई’ सुरु

Police
Police

शहरात १,९०० ठिकाणे शोधून कारवाई  
पुणे - शहरातील अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी खास ‘सफाई’ सॉफ्टवेअरची निर्मिती करून अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत पोलिसांनी अवैध धंदे सुरू असलेली १ हजार ९०० ठिकाणे शोधली असून, तेथील अवैध धंद्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

शहरामध्ये अवैध मद्यविक्री, मटका, जुगार अड्डे यांसह मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. पोलिस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आशीर्वादाने सर्व अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे या अवैध धंद्यांवरील कारवाई केवळ वरिष्ठांना कागदोपत्री दाखविण्यासाठी करण्याचा प्रकार केला जातो. यामुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांचे त्या-त्या परिसरामध्ये वर्चस्व निर्माण झाले आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यास त्यांनाही त्रास दिला जात होता, तर सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत तक्रार केल्यास त्यांच्या तक्रारीलाही काही अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखविली जात होती.

या प्रकरणाची पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी गांभीर्याने दखल घेऊन अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपायुक्त बच्चन सिंग यांनी ‘सफाई’द्वारे कारवाई करण्यावर भर दिला आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागातील अवैध धंदे, त्यांची इत्थंभूत माहिती, चालक-मालक व्यक्ती यांच्याबाबतची माहिती गोळा करून कारवाई करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यानुसार, पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात अवैध धंद्ये सुरू असलेली १ हजार ९०० ठिकाणे शोधली असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

शहरात अवैध धंदे सुरू असलेली १ हजार ९०० ठिकाणे शोधली असून, तेथील अवैध व्यवसायांवर कारवाई केली आहे. पुनर्तपासणीमध्ये कारवाई होऊनही अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. 
- अशोक मोराळे, अतिरिक्त पोलिस उपायुक्त (गुन्हे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com