esakal | कोरोना चीनमध्ये आला अन् त्याचा परिणाम मार्केट यार्डातल्या मिरचीवर झाला
sakal

बोलून बातमी शोधा

Chili
  • कोरोनोमुळे मिरची निर्यातीवर संकट
  • २०० रुपये किलो वरुन मिरची १२५ रुपयांवर

कोरोना चीनमध्ये आला अन् त्याचा परिणाम मार्केट यार्डातल्या मिरचीवर झाला

sakal_logo
By
प्रविण डोके

मार्केट यार्ड : चीनमध्ये आलेल्या कोरोनो व्हायरसमुळे चीनकडून लाल मिरचीची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे देशातील मिरची निर्यातीवर मोठे संकट उभे राहिले आहे. गेल्या पाच दिवसात लाल मिरचीचे दर १९०-२०० रुपये किलो वरुन १२०-१२५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यंदा देशात एकूण ३.२५ ते ३.५० करोड पोती उत्पादन होण्याची शक्यता आहे. भारतातून दर वर्षी मोठ्या प्रमाणात लाल मिरचीची निर्यात केली जाते. यामध्ये चीन हा मिरची खरेदी करणार सर्वांत मोठा ग्राहक आहे. त्यानंतर बांगलादेश, श्रीलंका, फिलीपिंस आणि थायलंड या देशामध्ये भारतीय लाल मिरची खरेदी केली जाते. सीड व्हरायटी लाल मिरची खरेदी प्रामुख्याने घरगुती मसाल्याचे कारखानदार अधिक करतात. परंतु चीनमध्ये आलेल्या कोरोनो व्हायरसाचा मिरचीच्या बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. ग्राहक नसल्याने निर्यात कमी झाली आहे. त्यामुळे लाल मिरचीचे दर मोठ्या प्रमाणात घटले असल्याची माहिती दि फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ ट्रेडर्सचे अध्यक्ष व मिरचीचे व्यापारी वालचंद संचेती यांनी दिली.

आप आमदाराच्या गाड्यांवर गोळीबार; एकाचा मृत्यू

दरम्यान बांगलादेश, फिलीपिंस, थायलंड या देशातून मागणी वाढल्याने थोडासा दिलासा असून, देशात प्रथमच गुंटूर बाजारात मोठ्या घडामोडी होत आहेत. दर वर्षी जानेवारीच्या सुरुवातील नवीन लाल मिरची बाजारात आल्यानंतर दर कमी होतात. परंतु या वर्षी आवक वाढून देखील दर कायम आहेत. परंतु येत्या काही दिवसांत चीनमध्ये कशी खरेदी होईल यावर दर चढ- उतार अवलंबून असणार आहेत.

काँग्रेसला धक्का; 'या' ज्येष्ठ नेत्याची एनआयएकडून चौकशी

याबाबत मिरचीच्या व्यापाºयांनी यापूर्वी मिरचीच्या दरामध्ये दररोज एवढे चढ-उतार होताना पाहिले नाहीत. आतापर्यंत लाल मिरचीचा दर किलो मागे १० रुपये वाढण्यासाठी १०-२० दिवस लागायचे. परंतु सध्या मिरचीच्या बाजारामध्ये दररोज मोठ्या घडामोडी होत असून, दर मोठ्या प्रमाणात कमी जास्त होत आहेत. असेही संचेती यांनी सांगितले. 

लाला मिरचीचे उत्पादन

राज्य अंदाजे उत्पादन
आंध्रप्रदेश व तेलंगणा   २ ते २.२५ करोड पोती
कर्नाटक  ६० ते ६५ लाख पोती
मध्यप्रदेश ८ ते १० लाख पोती