
वेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्यातील विंझर येथील शेतकऱ्यांचा ऊस व अन्य पिके विद्युत रोहित्र जळाल्यामुळे पाण्यावाचून करपू लागली होती. मात्र, पंधरा दिवस होऊनही रोहित्र न मिळाल्याने शेतकरी चिंतेत होते. याबाबत स्थानिक कार्येकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर अवघ्या तीन तासांतच विंझरकरांना रोहित्र मिळाले.
विंझर व कोंढवली येथील शेतकऱ्यांचे सुमारे दिडशे एकर क्षेत्र गुंजवणी नदीच्या पाण्यावर अंवलंबून आहे. येथील अनेक शेतकरी उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत असून, अनेक जण बागायती शेती करत आहे. या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतीचे पाणी पुरवठा परवाने घेतले आहेत. शेतीस पाणी देण्यासाठी महावितरणकडून येथे ६५ केव्हीचे विद्युत रोहित्र बसविले होते. मात्र, या परिसरात कायम विजेच्या भाराच्या तक्रारी होत्या. त्यातच बारा तास लोडशेडिंग व गेल्या पंधरा दिवसांपासून येथील विद्युत रोहित्रामध्ये बिघाड झाला.
याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क केले असता, लॉकडाउन परिस्थितीमध्ये रोहित्र दुरुस्त करणाऱ्या एजन्सी वेळेत येऊन काम करणे शक्य नसल्याचे उत्तर मिळाले. मात्र, काही दिवसांत रोहित्र न मिळाल्यास पाऊस सुरु होणार व पावसाळ्यात या ठिकाणी काम करणे शक्य नाही, उभी पिके वाया जाणाऱ तर लॉकडाऊन परिस्थितीमध्ये अनेक शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार, अशा अनेक समस्या शेतकऱ्यांसमो्र उभ्या राहिल्या. त्यानंतर येथील स्थानिक कार्यकर्ते विलास किर्वे, संतोष लिम्हण, माजी सरपंच संभाजी भोसले यांनी २९ मे रोजी बारामती लोकसभा मतदार संघाचे महावितरणचे समन्वयक सदस्य प्रविण शिंदे यांना दुरध्वनीद्वारे संपर्क केला.
शिंदे यांनी याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांना तात्काळ दिली. त्यानंतर खासदार सुळे यांनी मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्रसिंह बुंदिले यांना तत्काळ संपर्क केला. त्यानंतर अवघ्या तीन तासांत येथे विद्यूत रोहित्र तर आलाच, पण गेल्या अनेक वर्षापासून जास्त केव्हीचे रोहित्र बसविण्याची मागणी पूर्ण होत या ठिकाणी १०० केव्हीचे रोहित्र उपलब्ध झाले. त्यामुळे विंझर परिसरातील शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.