इजिप्त, तुर्कस्थानच्या कांद्याची चव आहे तरी कशी? ग्राहक काय सांगतात?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

कांद्याच्या भावाने शंभरी ओलांडल्यामुळे ग्राहकांना स्वस्त दरात कांदा मिळावा म्हणून तुर्कस्तानमधील कांदा चार दिवसांपूर्वी पिंपरी बाजारपेठेत दाखल झाला. मात्र, या कांद्याच्या खरेदीकडे शहरातील ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. तसेच हॉटेलचालक, खानावळ चालवणाऱ्या मंडळींनी हा कांदा खरेदी करण्यास नापसंती दर्शवली आहे. अपेक्षित उठाव नसल्यामुळे विक्रेतेही हैराण झाले आहेत.

पिंपरी - कांद्याच्या भावाने शंभरी ओलांडल्यामुळे ग्राहकांना स्वस्त दरात कांदा मिळावा म्हणून तुर्कस्तानमधील कांदा चार दिवसांपूर्वी पिंपरी बाजारपेठेत दाखल झाला. मात्र, या कांद्याच्या खरेदीकडे शहरातील ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. तसेच हॉटेलचालक, खानावळ चालवणाऱ्या मंडळींनी हा कांदा खरेदी करण्यास नापसंती दर्शवली आहे. अपेक्षित उठाव नसल्यामुळे विक्रेतेही हैराण झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

पुण्यातील बाजारपेठेत या कांद्यांची विक्री ६० ते ८० रुपये किलो दराने सुरू आहे. मात्र, पिंपरी बाजारपेठेत स्थिती उलट आहे. याठिकाणी या कांद्याचा एक किलोचा दर १५० रुपयांपर्यंत आहे. तुर्की कांद्याला चव नाही. त्यामुळे ग्राहक आकाराने मोठ्या दिसणाऱ्या या कांद्याची केवळ चौकशी करतात. मात्र, खरेदी करत नाहीत. इजिप्तमधील कांदादेखील चांगल्या प्रतीचा नसल्याने त्याची विक्री पिंपरी बाजारपेठेत कोणीच करत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात विदेशातील १२० टन कांदा पुण्याच्या बाजारपेठेत दाखल आला. मात्र, तेथेही त्याला अपेक्षित उठाव नसल्याने तो व्यापाऱ्यांकडे पडून आहे.

महत्त्वाची बातमी :  'असा' आहे मुंबईमध्ये उभारला जाणारा बाळासाहेब ठाकरेंचा 9 फुटी पूर्णाकृती पुतळा..

पिंपरीमधील विक्रेत्यांनी गेल्या आठवड्यात हा कांदा विक्रीसाठी आणला 
नव्हता. आता स्थानिक कांद्याचे भाव १५० रुपये किलोपर्यंत पोचल्यामुळे त्यांनी या कांद्यांची विक्री बाजारात सुरू केली आहे.

संभाजी भिंडेना सहानुभूतीचा प्रश्नच नाही; जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण 

विदेशी कांदा कशाला?
बाजारपेठेत कांद्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे सरकारने विदेशातून कांदा आणला आहे. सध्या देशात असणारे कांद्याचे दर आणि विदेशातून मागविलेल्या कांद्याचे दर सारखेच आहेत. असे असताना तुर्कस्तान आणि इजिप्तमधील कांदा कशाला हवाय? असा प्रश्‍न ग्राहक उपस्थित करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Customers Refuse to buy foreign onion in pimpri Market