यंदा मेडिकलचा कटऑफ वाढणार; 'नीट'चा पेपर विद्यार्थ्यांना सोपा गेल्याचा परिणाम!

Students_NEET_exam
Students_NEET_exam

पुणे : वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या 'नीट' या प्रवेश परीक्षेचा पेपर रविवारी (ता.13) पुण्यासह देशभरात झाला. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मिळालेला भरपूर वेळ आणि प्रश्‍न तुलनेत सोपे विचारले गेल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना ही परीक्षा चांगली गेली आहे. तसेच महाराष्ट्रातील 70ः30 हा कोटा रद्द केल्याने कटऑफ किमान 20 ते 25 गुणांनी वाढण्याची शक्‍यता आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) कोरोनामुळे लांबणीवर पडलेली 'नीट'ची परीक्षा रविवारी देशभरात 3 हजार 843 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. यासाठी 15 लाख 97 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पुण्यात सुमारे 22 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.

आयआयटीयन्स परीक्षा केंद्राचे संचालक दुर्गेश मंगेशकर म्हणाले, ''कोरोनामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी बराच वेळ मिळाला आणि प्रश्‍न सोपे विचारले गेल्याने बहुतांश विद्यार्थ्यांचे पेपर चांगले गेले आहेत आणि महाराष्ट्रातील 70ः30 हा कोटा रद्द केला गेल्याने कटऑफ 20 ते 25 गुणांनी वाढण्याची शक्‍यता आहे. यंदा फिजीक्‍सचे अनेक प्रश्‍न कन्सेप्ट बेस ऐवजी फॉर्म्युला बेस विचारण्यात आले होते.

एलन करिअर इन्सिट्यूटचे शैक्षणिक प्रमुख अरुण जैन म्हणाले, ''कोरोनाचा विचार करून सर्वच परीक्षा केंद्रांवर योग्य खबरदारी घेण्यात आली होती. फिजिक्‍सचे प्रश्‍न गेल्यावर्षीच्या तुलनेत सोपे होते. काही प्रश्‍न अभ्यासक्रमाबाहेरील होते, पण त्यांची काठिण्य पातळी कमी होती. केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे बहुतांश प्रश्‍न 'एनसीईआरटी'च्या अभ्यासक्रमावर आधारित असल्याने विद्यार्थ्यांना उत्तरे देणे सोपे गेले. त्यामुळे कटऑफ वाढणार आहे.

''पेपर जास्त अवघड नव्हता, त्यामुळे मला चांगले गुण पडतील असा विश्‍वास आहे. मात्र, पेपर सुरू होताना त्यात माहिती भरण्यासाठी 10ते 15 मिनीट गेल्याने पेपर सोडविण्यासाठी तेवढा वेळ कमी झाला. पेपर थोडा लवकर हातात पडणे गरजेचे होते.''
- विधी मराठे, विद्यार्थिनी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com