Video : 'चला आता स्वच्छ-शुद्ध हवा येऊ द्या'; भारत गणेशपुरेंचे नागरिकांना भावनिक आवाहन

Bharat_Ganeshpure
Bharat_Ganeshpure

पुणे : स्वच्छ हवा मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे, असे मत अभिनेते भारत गणेशपुरे यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. 

वातावरण फाउंडेशनद्वारे स्वच्छ हवेसाठी चालवल्या जाणाऱ्या 'साफ श्वास २४ तास’' या अभियानाला गणेशपुरे यांनी पाठींबा दर्शवला आहे. ते म्हणाले, "हवा प्रदूषणावर वेळीच उपाय केले गेले नाही, तर येणाऱ्या पिढीला स्वच्छ श्वास घेण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागणार आहे. येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी स्वच्छ हवेचा वसा आपल्याला जपून ठेवावा लागेल." स्वच्छ हवेसाठीचा हा विशेष दिन जगभरात प्रथमच साजरा केला जात आहे. 

जागतिक आरोग्य संघटने नुसार (डब्लूएचओ) जगभरात दर वर्षी हवा प्रदुषणामुळे ७० लाख लोक मृत्यू पावतात. आणि लँन्सेंट हेंल्थ जर्नल नुसार महाराष्ट्रात दरवर्षी १.८ लाख लोक हवा प्रदूषणाला बळी पडतात. येणाऱ्या काळात हवाप्रदुशानाचे संकट अधिकच गंभीर होईल  याची शक्यता नाकारता येत नाही. हवा प्रदूषण आणि तापमान वाढ हे आजच्या काळातील जगा समोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. तापमान वाढीत हवा प्रदूषण हे  भर घालते. जगभरात सर्वाधिक प्रदूषित असणारे शहर हे भारतात आहे. ही बाब नक्कीच भूषणावह नाही. नॉन-अटेनमेंट म्हणजेच राष्ट्रीय वायू गुणवत्ता मानकांची लक्ष्ये न गाठता येणाऱ्या शहरांची सांख्या भारतात १०२ इतकी आहे. हवा प्रदूषणामध्ये देशभरात महाराष्ट्र हे आपले राज्य अव्वल स्थानी आहे. एकट्या महाराष्ट्रात १८ शहरे ही पर्यावरणीय आरोग्याच्या बाबतीत व्हेंटिलेटरवर आहेत.

भविष्यात येणाऱ्या पिढीला स्वछ श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर ही गरजेची बाब बनू नये, या अनुषंगाने गणेशपुरे यांचे आवाहन हे येणाऱ्या पिढीच्या सुरक्षिततेच्या आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते, हवा प्रदूषणाचा लहान मुलांच्या फुफ्फुसांवर एकंदरीतच त्यांच्या आरोग्यावर सर्वाधिक गंभीर दुष्परिणाम होत असतो. याची पुनरावृत्ती भविष्यात टाळायची असेल, तर हरित ठिकाणांचे संवर्धन आणि प्रदूषणावर नियंत्रण हा मूलमंत्र सर्वांनी अंगिकारला पाहिजे.  

आजपर्यंत भारत गणेशपुरे यांना ‘चला हवा येउद्या’च्या मंचावर आपण पाहिले आहे. त्यांच्या वैदर्भीय भाषेच्या विनोदाने संबंध महाराष्ट्राच्या मनावर ते राज्य करत आहेत. विनोदी अभिनयाचा शिलेदार म्हणून या महाराष्ट्राने भारत गणेशपुरे यांना नेहमीच अनुभवले आहे. त्यांच्यावर भरभरून प्रेम केले आहे. करत आहे.  कलाकार म्हणून अनेक कलावंत विविध मुखवटे धारण करत असतात. मात्र, कलावंतही या सामाजिक जानिवेचे अपत्य असते. स्वछ हवेसाठी घेतलेल्या पुढाकारातून दूरदृष्टी असणारा कलावंत म्हणून भारत गणेशपुरे यांची नवी ओळख महाराष्ट्राला होईल. भारत गणेशपुरे यांनी स्वछ हवेसाठी घेतलेला पुढाकार हा समाजासाठी दिशादर्शकाचे काम करेल.

हवा प्रदूषणाविषयी आकडे बोलतात :
- जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात दर वर्षी मृत्यू पावणाऱ्यांची संख्या : ७० लाख
- लँन्सेंट हेंल्थ जर्नलनुसार महाराष्ट्रात दरवर्षी जाणारे बळी : १.८ लाख
- हवेची गुणवत्ता खराब असलेली देशातील शहरे : १०२ 
- राज्यातील हवेची गुणवत्ता खराब असलेली शहरे : १८

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com