Corona Virus : लॉकडाऊनमध्येही सायबर गुन्हेगार करताहेत फसवणूक

Cyber ​​criminals commit fraud even in situations caused by Corona
Cyber ​​criminals commit fraud even in situations caused by Corona

पुणे  : वाहन कर्ज घेतलेल्या व्यक्तीला अनोळखी व्यक्तीने फोन करून सरकारच्या आदेशाप्रमाणे तुमचे कर्ज तीन महिन्यानंतर देण्याची व्यवस्था करतो, असे सांगत ओटीपी क्रमांक मागितला.मात्र सजग नागरिकाने थेट  संगणक तज्ञाकडे संपर्क साधल्यानंतर हा 'सायबर फ्रॉड"चा नवीन प्रकार उघडकीस आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बँकांना विविध प्रकारचे कर्ज तीन महिन्यानंतर घेण्याबाबत दिलेल्या आदेशाचा वापर सायबर गुन्हेगार नागरिकांच्या फसवणूकीसाठी करीत असल्याचे प्रकार शहरात घडत आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीला नागरीक सामोरे जात आहेत. केंद्र सरकारनेही नागरीकांची होणारी तारांबळ लक्षात घेऊन वाहने, व्यावसाय व गृहकर्जे सध्याचे तीन महिने न घेता, त्यापुढे ते पुढे घेण्यासंदर्भातची महत्वाची भुमिका घेतली आहे. त्यासंदर्भातचे आदेशही बॅंकांना देण्यात आले आहेत. दरम्यान, यापुर्वी फास्टटॅगचा सायबर फसवणुकीसाठी वापर करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी परिस्थिती पाहून आता कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर कर्जाबाबत नागरीकांना बॅंकेकडून मिळणारा दिलासा लक्षात, घेऊन त्यांची फसवणूक करण्यास सुरूवात केली आहे. 

Coronavirus : लॉकडाऊनमध्येही तुम्हाला करता येणार परराज्यात प्रवास

बहुतांश नागरीक सरकारी, खासगी बॅंका, वित्तीय संस्थांकडून वाहन, व्यावसाय किंवा गृहकर्जे घेतात. या कर्जांचा हफ्ता (ईएमआय) त्यांच्या बॅंक खात्यातुन वळविला जातो. सध्या हेच कर्जाचे हफ्ते सरकारने पुढे ढकलले आहेत. या परिस्थितीमध्ये काही सायबर गुन्हेगार नागरीकांना ईमेल, फोनद्वारे संपर्क साधत आहेत. आपण बॅंकेतुन बोलत असल्याचे भासवून ते नागरीकांना त्यांच्या कर्जाचा हफ्ता पुढे ढकलण्यासाठी बॅंक खात्यासंबंधीचा ओटीपी मागत आहेत. ओटीपी घेऊन नागरीकांची फसवणूक करीत आहेत. 

संगणक तज्ञ डॉ.दीपक शिकारपूर यांना त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीचा फोन आला होता. त्यानंतर सायबर गुन्हेगार आता कोरोनाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करण्यासाठी आता कोरोनाच्या नावाखाली वेगवेगळ्या क्‍लृप्त्या लढवीत फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागातील काही नागरिकांनी हा अनुभव येत असल्याची सद्यस्थिती आहे.


coronavirus : पुणे जिल्ह्यातील 'ही'; २० तपासणी केंद्रे सुरू राहणार २४x७!
" सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्हेगारांकडून वाहन, व्यावसाय व गृहकर्जाच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सरकारने ही कर्जे पुढे ढकलली आहेत. हाच कर्जाचा हफ्ता पुढे ढकलण्यासाठी सायबर गुन्हेगार नागरीकांच्या बॅंक खात्याचा ओटीपी घेऊन त्यांची फसवणूक करीत आहेत. नागरिकांनी खोट्या ईमेल, फोन प्रतिसाद देऊ नये "
- डॉ.दीपक शिकारपूर. संगणकतज्ज्ञ. 


Corona Virus : पुण्यात आणखी ४ जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा पोहोचला...
अशी घ्या काळजी 
- आपला ओटीपी, पासवर्ड कुणालाही देऊ नका 
-  बॅंक कधीही ओटीपी व अन्य माहिती विचारत नाही 
-  अनोळखी व्यक्तींच्या भुलथापांना बळी पडू नका 
-  कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करुनच बॅंक व्यवहार करा 
- अनोळखी व्यक्तींबाबत संशय आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा 

पोलिस नियंत्रण कक्ष - १००
सायबर पोलिस ठाणे - ०२०- २९७१००९७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com