
देशात ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रॅक्टिव्ह पल्मनरी डिसीज’मुळे (सीओपीडी) होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. या आजाराने दरवर्षी सुमारे दहा लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागले. घरोघरी होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे हा आजार होण्याची दाट शक्यता असते.
‘सीओपीडी’मुळे दर वर्षी दहा लाख मृत्यू; पुणे जिल्ह्यातील नागरिक मात्र अनभिज्ञ
पुणे - देशात ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रॅक्टिव्ह पल्मनरी डिसीज’मुळे (सीओपीडी) होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. या आजाराने दरवर्षी सुमारे दहा लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागले. घरोघरी होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे हा आजार होण्याची दाट शक्यता असते. परंतु, साक्षरतेत अग्रक्रमावर असलेल्या पुणे जिल्ह्यातील नागरिक या आजाराबाबत साक्षर नसल्याचे स्पष्ट झाले. चुलीचा धूर, मॉस्किटो कॉईल यांसारख्या गोष्टींमुळे होणाऱ्या या आजाराबाबत ९९ टक्के नागरिकांना माहितीच नसल्याची धक्कादायक बाब एका अभ्यासातून समोर आली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
चेस्ट रिसर्च फाउंडेशन व भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाने केलेल्या अभ्यासाची माहिती नुकतीच ‘नेचर’ या शोधपत्रिकेत प्रकाशित केली आहे. पल्मोकेअर रिसर्च अँड एज्युकेशन (प्युअर) फाउंडेशनच्या प्रकल्प व्यवस्थापक दिशा घोरपडे, महाराष्ट्र आरोग्य सेवेचे माजी संचालक डॉ. प्रकाश डोके, प्युअर फाउंडेशनचे संचालक डॉ. संदीप साळवी आदींनी यात सहभाग घेतला होता. यामध्ये जिल्ह्यातील झोपडपट्ट्या आणि ग्रामीण भागात ‘सीओपीडी’ संबंधित जनजागृती आहे काय?, याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. यात फक्त ०.९ टक्के नागरिकांनीच सीओपीडीबाबत ऐकल्याचे स्पष्ट झाले.
Video:क्रिकेट खेळतानाच मैदानात कोसळला; खेळाडूचा जागीच मृत्यू
असा झाला अभ्यास
निष्कर्ष
पुणेकरांनो कोरोनाला इथेच रोखा; वाचा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
काय आहे ‘सीओपीडी’ ?
सीओपीडीमुळे श्र्वास नलिकेच्या शेवटी असलेल्या फुग्यांवर (एअर सॅक) परिणाम होतो. त्यामुळे पर्याप्त ऑक्सिजन शरीराला मिळत नाही. तसेच कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. शरीराला लागणारी ऊर्जा ही ९० टक्के ऑक्सिजनमुळे निर्माण होते. त्यामुळे या आजाराचा परिणाम फक्त फुफ्फुसांवरच नाही तर इतर अवयवांवरही होतो. तर एचआयव्ही एड्स, टीबी, हिवताप आणि मधुमेह या सर्व आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूच्या तुलनेत ‘सीओपीडी’मुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक आहे, असे छातीरोगतज्ज्ञ व प्युअरचे फाउंडेशनचे संचालक डॉ. संदीप साळवे यांनी सांगितले.
कोरोनाचा ससंर्ग वाढतोय; बारामतीत प्रशासनाने दिले खबरदारीचे आदेश
देशात सीओपीडीबाबत जनजागृती करण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. तर देशातील ४० टक्के लोकसंख्या ही झोपडपट्टीमध्ये राहते. चूल पेटवणे, मच्छरसाठी जाळले जाणारे कॉईल, धूम्रपान अशा विविध कारणांमुळे घरातील वायू प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे याचा परिणाम फुफ्फुसांवर होतो. लोकांमध्ये याची जनजागृती करण्याची गरज आहे.
- दिशा घोरपडे, प्रकल्प व्यवस्थापक, प्युअर फाउंडेशन
Edited By - Prashant Patil