पुणे : भुसार बाजार लवकरच सुरू होणार; मात्र मर्यादित मालाची होणार आवक!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

कोरोनाची साखळी तुटावी यासाठी मंगळवारपासून पाच दिवस बाजार बंद ठेवण्याचा निर्णय चेंबरने घेतला होता. या काळात बाजार समितीने संपूर्ण बाजारस्थळाचे निर्जंतुकीकरण केले आहे.

une-news" target="_blank">पुणे) : मार्केट यार्डातील गूळ-भुसार बाजारात धान्य आणि किराणा माल मर्यादित मागवून सोमवार (ता.२५) पासून बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शनिवारी (ता.२३) चेंबरच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

व्यापारी सभासदांनाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे ओस्तवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा, सहसचिव अनिल लुंकड, नगरसेवक प्रविण चोरबेले, जवाहरलाल बोथरा, सुभाष पालरेचा उपस्थित होते.

- कोथरूडकरांची काळजी वाढली; औषध व्यावसायिकाला झाली कोरोनाची लागण!

ओस्तवाल म्हणाले, ''गूळ-भुसार विभागातील जवळपास १५ व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच यामध्ये दोन व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भुसार बाजार बंद ठेवण्यात आला होता. व्यापाऱ्यांनी मागील दोन महिने नियमित बाजार सुरू ठेवला आहे. त्याबद्दल जिल्हाधिकारी, पणन संचालक, बाजार समिती प्रशासनाने व्यापाऱ्यांचे कौतुक केले.''

- शहरांमधील बांधकाम व्यावसायिक सापडले नियमावलीच्या कात्रीत; वाचा सविस्तर बातमी

व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर कोरोनाची साखळी तुटावी यासाठी मंगळवारपासून पाच दिवस बाजार बंद ठेवण्याचा निर्णय चेंबरने घेतला होता. या काळात बाजार समितीने संपूर्ण बाजारस्थळाचे निर्जंतुकीकरण केले आहे. तसेच शरीरातील तापमान तपासणीसाठी थर्मल गण, सॅनिटायझर, बाधित परिसरातील लोकांना बाजारात प्रतिबंध आदी उपाययोजना केल्या असल्याचे ओस्तवाल यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना दणका  

गर्दी कमी करण्यासाठी बाजारातील व्यापाऱ्यांनी जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहार करावे. तसेच मालाची ऑर्डर ई-मेल आणि फोनद्वारे घेऊन माल टेम्पोद्वारे पोहचं करण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे बाजारात गर्दी कमी होण्यास मदत होईल.
- प्रवीण चोरबेले, माजी अध्यक्ष, दि पूना मर्चंंट्स चेंबर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decision to start bhusar market was taken by the Poona Merchants Chamber