
पुणे : "शाळा सुटली...पाटी फुटली...सुटी लागली' असं काही म्हणण्यापूर्वीच शाळांना बेमुदत सुटी लागली...मात्र, आता पालकचं काय, मुलंही कंटाळली आहेत. सर्वांना वेध लागलेत शाळा सुरू व्हायचे...नवी कोरी पुस्तक- वह्या खरेदी कराव्यात...वॉटर बॉटलपासून शूजपर्यंत लागणारी प्रत्येक गोष्ट जमा करावी, असे प्लॅन आखले जात आहेत. पण, जूनमध्ये तरी शाळा सुरू होणार की नाही, याची आज तरी खात्री नाही. त्यामुळे आता मुलांना बहुतेक, "सांग सांग भोलानाथ...शाळा भरेल काय?' असे गीत म्हणायीचच वेळ आली आहे.
''कोरोनाचा संसर्ग वाढत असताना देखील 15 जूनला शाळा सुरू करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या अट्टहासाला लॉकडाऊनची मुदतवाढ व कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मुरड घालावी लागली आहे. त्यामुळे 15 जुनला शाळा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला असला तरीही, यावर आता लॉकडाऊन संपल्यानंतरची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल,'' असे शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राज्यातील बहुतांश शाळांमध्ये आसपासच्या वस्त्यांमधील नागरिकांचे विलगीकरण करण्यात आले आहे. तर काही शाळा रेड झोन, ऑरेंज झोनमध्ये मोडतात. असे असतानाही राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही 15 जूनला शाळा सुरू करण्याचा मानस असल्याचे मागील आठवड्यात ट्विटरद्वारे जाहीर केले होते. त्यानंतर शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावर झालेल्या ऑनलाईन बैठकांमध्येही त्याचा पुनरूच्चार करण्यात आला. 15 जुनला शाळा सुरू करण्याच्या भुमिकेची शाळा व्यवस्थापनाने चांगलीच धास्ती घेतली होती. परंतु लॉकडाऊन वाढविल्यामुळे शाळा व्यवस्थापनाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
पुण्यातल्या `त्या` भीती वाटणाऱ्या जागा अन् कीर्ररररर....शांतता!
शालेय शिक्षण मंत्री म्हणतात, "दरवर्षीप्रमाणे यंदाही 15 जूनला शाळा सुरू करण्याचा आमचा मानस होता. परंतु लॉकडाऊन वाढविल्यामुळे आणि कोरोनाच्या संसर्गाची राज्यातील सद्यस्थिती पाहता हे शक्य होणार नाही. मात्र, संबंधित स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी, शाळा व्यवस्थापन यांनी स्थानिक परिस्थिती पाहुन शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घ्यावा, असे आपण सुचवित आहोत. त्यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन समितीला कळविण्यात आले आहे,'' अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. त्या म्हणाल्या,""शाळा सुरू होण्यापूर्वी त्यांचे निर्जुंतकीकरण करणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे, सोशल डिस्टन्सिंटसह कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या नियमावलीचे पालन करणे, अशा सुचनाही शाळा देण्यात येत आहेत.''
अरे बापरे ! मार्केट यार्डात पुणेकरांची झुंबड; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
पुढील परिस्थिती पाहून निर्णय घेऊ : शिक्षण आयुक्त
"दरवर्षी राज्यात 15 जूनला आणि विदर्भात 26 जूनला शाळा सुरू होतात. परंतु यंदा कोरोनाच्या वाढता संसर्ग लक्षात घेता, दरवर्षीप्रमाणे यंदाही 15 जूनपर्यंत शाळा सुरू करणे शक्य होईल, असे वाटत नाही. 31 मे पर्यंत लॉकडाऊन आहे, त्यानंतर परिस्थिती पाहून आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून पावले उचलली जातील.''
- विशाल सोळंकी, राज्य शिक्षण आयुक्त
बारामती तालुक्यात कोरोनाची मुंबई मार्गे पुन्हा एन्ट्री...
शाळा घेणार ही खबरदारी :
- इमारत आणि आवाराचे निर्जंतुकीकरण
- सॅनिटाझर आणि वारंवार हात धुण्यासाठी सुविधा
- वर्गामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन; त्यानुसार वर्ग भरविण्याचे नियोजन
- मास्क अनिवार्य
- विद्यार्थ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी अधिक दक्षता
- वेळच्यावेळी आरोग्य तपासणीचा आग्रह
- विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे असेल लक्ष
पुण्याच्या सदाशिव पेठेतील 'ते' ३३ रूग्ण बरे; संपर्कात आलेल्यांना शोधणे ठरतेय अवघड
पालकांचे म्हणणे :
- शाळांनी ई-लर्निंगची सोय उपलब्ध करावी
- किमान सुरवातीचे काही महिने तरी, शाळेत येण्याचा आग्रह नसावा
- यावर्षी हजेरीवरून मुल्यांकन नको
- "स्टडी फ्रॉम होम'ला प्राधान्य असावे
थरारक! पुण्यात एका घरावर अंदाधुंद गोळीबार; एक गंभीर जखमी
"शाळेत एका वर्गात जवळपास 40 ते 50 विद्यार्थी असतात. परंतु आता विद्यार्थ्यांच्या व्यवस्था काय असेल, सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे की नाही, या गोष्टी पालक म्हणून बारकाईने पाहिल्या जातील. त्यानंतरच मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, हे ठरविले जाईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक त्याचबरोबर आरोग्यविषयक नुकसान होणार नाही, याची खबरदारी शाळा व्यवस्थापनाने घेणे गरजेचे आहे.'
- लक्ष्मण शिंदे, पालक, विश्रांतवाडी
शरिरातील पेशींच्या हालचालींवर ठेवता येणार लक्ष; पुण्यात झालं संशोधन
"शिक्षणाधिकाऱ्यांसमवेत मागील आठवड्यात ऑनलाईनद्वारे बैठक घेण्यात आली. त्यावेळी शाळा सुरू झाल्यानंतर काय काळजी घ्यावी याबाबत, सूचना करण्यात आल्या. यामध्ये शाळेत निर्जंतुकीकरण करण्याला महत्त्वाचे राहणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी संख्या पाहता सोशल डिस्टिन्सिंग पाळण्यासाठी पाचवी ते दहावीची शाळा दोन सत्रात भरवावी लागेल.
- नानाराव कांबळे, मुख्याध्यापक, नुतन माध्यमिक विद्यालय, केशवनगर
पॉझिटिव्ह बातमी : पुण्याची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा होतेय 'आत्मनिर्भर...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.