इंदापूर शहरात दोन कोरोनाबाधित आढळल्यामुळे घेतलाय हा निर्णय

डाॅ. संदेश शहा
Saturday, 13 June 2020

इंदापूर शहरातील कसबा परिसरातील एक महिला रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या 21 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठवून देण्यात आले आहेत.

इंदापूर (पुणे) : इंदापूर शहरातील दोन जण कोरोनाबाधित आढळल्यामुळे प्रशासनाने कडक पाउले उचलली आहे. शहरात रविवारी (ता. 14) जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. तसेच, रुग्ण आढळलेला कसबा आणि मंडई परिसर सील करण्यात आला आहे. 

इंदापूर शहरातील कसबा परिसरातील एक महिला रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या 21 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठवून देण्यात आले आहेत. संबंधित कोरोनाबाधित महिला आपल्या वकील पतीसमवेत पुण्यात गेली होती. तसेच, मंडई परिसरात आढळलेला रुग्णाला न्यूमोनिया झाला होता. त्यामुळे त्याला पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यासही कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  

पाऊस डोक्यावर असताना पुण्यातील 900 कुटुंबांच संसार उघड्यावर
 
नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगरसेवक भरत शहा, गटनेते कैलास कदम, मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल, नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मोहन शिंदे, सोमनाथ तारगावकर व सहकाऱ्यांनी आज सकाळपासून हे परिसर 14 दिवसांसाठी सील केले. तसेच, परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.

आदिवासी शेजमजुरांना नव्हते काम, ही योजना आली त्यांच्या मदतीला 

तसेच, सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, तहसीलदार सोनाली मेटकरी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल, प्रताप पाटील, विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, धनंजय बाब्रस, श्रीधर बाब्रस यांनी या परिसरास भेट देऊन सर्वांशी संवाद साधला.

कोरोनामुळे जिम व्यवसायिकांच्या अडचणीत वाढ

या वेळी भरणे म्हणाले की, इतक्या दिवस बाहेरगावावरून आलेल्या रुग्णास कोरोना बाधा झाली. मात्र, आता शहरातून बाहेर गेलेल्यास कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे कोरोनामुक्त होण्यासाठी योग्य काळजी घ्या, काळजी मात्र करू नका. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या वेळी ऍड. प्रमोद मलठणकर, चंद्रकांत बडदाळे, बंडा दुनाखे, डी. एन. जगताप, सचिन सपकळ उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The decision was taken for Indapur as Corona's patient was found