पुण्यात लॉकडाउन जाहीर होण्याची चर्चा, प्रशासन म्हणतय... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

पुणे शहरातील नागरिकांकडून सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवला जात आहे. रस्त्यावरही गर्दी वाढत आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नाही. त्यामुळे पुणे शहर व जिल्ह्यात लॉकडाउन होणार असल्याची चर्चा केली जात आहे.

पुणे : पुणे शहर व जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रुग्ण रोज शेकड्यांमध्ये सापडत असले, तरी तूरतास कोणत्याही स्वरुपाचा लॉकडाउन होणार नसल्याचे प्रशासकीय यंत्रणांकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे.

आळंदीचे मुख्याधिकारी भूमकर यांची बदली

प्रशासनाच्या या निर्णयामुळे पुणे शहरातील सर्व व्यवहार सुरुळीत राहतील. मात्र, ज्या भागामध्ये रुग्ण संख्या आणि मृत्यूदर वाढत आहे, तिथे मात्र बंधने घालून काही दुकाने व व्यवहार बंद ठेवण्याचा विचार महापालिका करत आहे. परंतु, त्याबाबतचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. येत्या 15 जुलैपर्यंत नवीन आदेश येतील, त्यानंतर त्याची अंमलबजवाणी होऊ शकते. 

रांजणगाव गणपती येथील तिघांची कोरोनावर मात

पुणे शहर व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. एकट्या पुणे शहरात रोज साधारणपणे आठशे ते हजारच्या घरात रुग्ण सापडत आहेत. त्याच वेळी गंभीर रुग्णांचीही संख्या वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडाही रोज मोठा असतो. एकाच दिवसात 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. एकाच दिवसात सर्वाधिक 937 रुग्ण सापडलेले आहेत. त्याचवेळी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार जोरात सुरू आहे. दौंड, सासवड या शहरांतील कोरोनाचा वेग चिंताजनक आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

दुरुस्तीसाठी थांबलेल्या लालपरीला अचानक आग

या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील नागरिकांकडून सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवला जात आहे. रस्त्यावरही गर्दी वाढत आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नाही. त्यामुळे पुणे शहर व जिल्ह्यात लॉकडाउन होणार असल्याची चर्चा केली जात आहे. मात्र, प्रशासकीय यंत्रणांकडून त्याला स्पष्ठ नकार देण्यात आला आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

येत्या 15 जुलैपर्यंत असा कोणताही विचार नसल्याचे प्रशासकीय यंत्रणेतील जबाबदार अधिकाऱ्यांनी स्पष्ठ केले आहे. त्यामुळे पुणे शहरातील सर्व व्यवहार सुरुळीत राहतील. मात्र, त्याचवेळी ज्या भागामध्ये रुग्ण संख्या आणि मृत्यूदर वाढत आहे, तिथे मात्र बंधने घालून काही दुकाने व व्यवहार बंद ठेवण्याचा विचार महापालिका करत आहे. परंतु, त्याबाबतचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This decision will be taken by the administration regarding lockdown in Pune city