SPPU Admission : गुणपत्रका अभावी करिअर दावणीला; विद्यापीठांच्या रखडलेल्या परीक्षेचा फटका

केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाही तर कोरोनानंतर अजूनही अनेक विद्यापीठांचे शैक्षणिक वेळापत्रक पूर्ववत झालेले नाही.
 degree admission
degree admission esakal

SPPU Admission - वाणिज्य शाखेत बी.कॉमच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या ओंकारने पुढे वकिली करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया उत्तीर्ण होत एलएलबीसाठी अर्जही दाखल केला.

परंतु, अजूनही बीकॉमच्या परीक्षा चालू असल्यामुळे त्याच्याकडे शेवटच्या वर्षाचे गुणपत्रक नाही. पर्यायाने सोमवार (ता.१०) पर्यंतची मुदत संपल्यानंतर. त्याचा एलएलबीचा प्रवेश नाकारला जाण्याची शक्यता आहे. केवळ ओंकारच नाही तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थ्यांची हीच अवस्था असून, गुणपत्रक अभावी त्यांचे करिअरच दावणीला बांधले गेले आहे.

 degree admission
Mumbai Crime : मला ब्लॉक का केलं...असे विचारताच महिलेचा पती व तरुणाचा राडा

केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाही तर कोरोनानंतर अजूनही अनेक विद्यापीठांचे शैक्षणिक वेळापत्रक पूर्ववत झालेले नाही. त्यामुळे एप्रिल- मे महिन्यात होणाऱ्या परीक्षांना उशीर झाला आहे. अजूनही अनेक विषयांच्या परीक्षा बाकी असल्यामुळे निकालाला उशीर होत आहे.

त्यात राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वेळेत प्रवेश प्रक्रिया पार पडण्यासाठी विद्यार्थ्यांनी शेवटच्या वर्षाचे गुणपत्रक जमा करणे आवश्यक आहे. अशा दुहेरी अडचणीत विद्यार्थी सापडले असून, परीक्षेचा अभ्यास करावा की प्रवेश प्रक्रियेची पूर्तता करावी यात ते अडकले आहे.

 degree admission
Mumbai Crime : व्यावसायिकाकडे 90 हजार रुपयांची मागणी करणाऱ्या तोतया अग्निशमन अधिकाऱ्याला अटक

विद्यार्थ्यांसमोरील अडचणी..

- पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी गुणपत्रकच उपलब्ध नाही

- व्यावसायिक प्रवेश प्रक्रियेतून बाद होण्याची शक्यता

- यंदाचे प्रवेश प्रक्रियेतून बाद होत, वर्ष वाया जाण्याची शक्यता

- पुढील वर्षी पुन्हा प्रवेश परीक्षेचा अभ्यास करावा लागेल

- शेवटच्या वर्षाच्या परीक्षेचा अभ्यास करायचा की गुणपत्रकासाठी प्रयत्न करायचे

 degree admission
Mumbai Crime : व्यावसायिकाकडे 90 हजार रुपयांची मागणी करणाऱ्या तोतया अग्निशमन अधिकाऱ्याला अटक

पदव्युत्तर प्रवेशात अडचणी

महाविद्यालयीन परीक्षा बाकी असल्याने बहुतेक पदवी अभ्यासक्रमांचे निकाल अजून बाकी आहे. त्यामुळे व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्यांसह पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण येत आहे. त्यामुळे या वर्षीही प्रवेश प्रक्रिया वेळेत पार पडण्याचे आव्हान सीईटी सेलकडे असणार आहे.

 degree admission
Mumbai Crime : व्यावसायिकाकडे 90 हजार रुपयांची मागणी करणाऱ्या तोतया अग्निशमन अधिकाऱ्याला अटक

विद्यार्थी विद्यापीठाकडून घोषीत झालेल्या ऑनलाईन निकालाची प्रत अपलोड करू शकतात. मुळ गुणपत्रक नंतर महाविद्यालयांकडे जमा करावे.

- घनश्याम केदार, सहाय्यक परीक्षा समन्वयक, सीईटी सेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com