esakal | पोस्टातील पासपोर्ट कार्यालये बंद असल्याने गैरसोय; सुरू करण्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

पोस्टातील पासपोर्ट कार्यालये बंद असल्याने गैरसोय; सुरू करण्याची मागणी

हजारो लोकांची ही कार्यालय बंद असल्याने गैरसोय होत असल्याने तातडीने ही कार्यालय पुन्हा सुरु करावीत, अशी लोकांची मागणी आहे.  

पोस्टातील पासपोर्ट कार्यालये बंद असल्याने गैरसोय; सुरू करण्याची मागणी

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : राज्याच्या विविध भागात सुरु केलेली पोस्टातील पासपोर्ट कार्यालय गेली सात महिने बंद असल्याने लोकांना पासपोर्ट काढणे व नूतनीकरणासाठी पुणे मुंबई नागपूर किंवा ठाणे येथे धाव घ्यावी लागत आहे. हजारो लोकांची ही कार्यालय बंद असल्याने गैरसोय होत असल्याने तातडीने ही कार्यालय पुन्हा सुरु करावीत, अशी लोकांची मागणी आहे.  

‘अहो, मास्क घाला, गळ्यात कशाला अडकवलाय? पीएमपी कंडक्टरांची वाढली डोकेदुखी

ग्रामीण भागातील लोकांना पासपोर्टचे अर्ज दाखल करण्यासाठी शहरात जावे लागू नये व शहरातील कार्यालयांवरील ताण कमी व्हावा या साठी देशभरातील अनेक पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यात आले. बारामतीतही असे केंद्र सुरु झाले होते, त्या मुळे बारामतीकरांचा पुण्याचा हेलपाटा वाचत होता. 

कोविडचे संकट सुरु झाल्यानंतर लगेचच देशभरातील पोस्टातील पासपोर्ट सेवा केंद्र बंद करण्याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने घेतला होता. त्या काळात या केंद्रावर होणारी गर्दी विचारात घेऊन हा निर्णय झाला होता. आता मात्र अनलॉकच्या प्रक्रीयेत पोस्टासह सर्वच शासकीय कार्यालय सुरु झाली आहेत. त्या मुळे पोस्टातील पासपोर्ट कार्यालयही सुरु व्हावे, अशी लोकांची मागणी आहे. 

Video : ‘जंबो’नं दिलं नवं आयुष्य; रुग्णांनी व्यक्त केली कृतज्ञता

राज्यात 39 पोस्टातील पासपोर्ट कार्यालय...
महाराष्ट्रात मुंबई मध्ये 12, नागपूरअंतर्गत 10 व पुण्याअंतर्गत पश्चिम महाराष्ट्रात 17 अशा एकूण 39 पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालय सुरु आहेत. लोकांना आपापल्या गावातच पासपोर्टचे काम करता यावे या उद्देशासह मुख्य कार्यालयांवरील ताण कमी व्हावा या साठी ही सुविधा सुरु केली आहे, मात्र सध्या सगळीच कार्यालय बंद असल्याने लोकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. 

पुण्यात कोरोनाचा दुसरा टप्पा येण्याच्या शक्‍यतेने महापालिकेने असे केले नियोजन

 हा विषय परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीतील असल्याने या बाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करुन, यात काही मार्ग काढणे शक्य आहे का याची चाचपणी करु- संभाजी होळकर, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, बारामती 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)