अजितदादांची कामांवर बारीक नजर...ऑन दि स्पॉट जाऊन सूचना...  

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती येथे विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. 

बारामती (पुणे) : बारामती शहरासह तालुक्यात सुरू असलेली विकासकामे करताना भविष्यातील गरजा लक्षात घेऊन प्राधान्याने विकासकामे मार्गी लावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

पेट्रोल- डिझेलच्या दरावरून पुणेकरांना असाही दिलासा...
       
उपमुख्यमंत्री पवार यांनी आज बारामती येथे विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांनी सूचना केल्या. या वेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओहोळ आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कोंढापुरीत पर्यावराणासाठी झटताहेत ग्रामस्थ
            
उपमुख्यमंत्री पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती जळोची, माळेगाव व मेडद येथे होणाऱ्या नवीन रस्त्यांची कामे, तांदूळवाडी येथील पिण्याच्या पाण्याचा साठवण तलाव, क्रीडा संकुल, गौतम बाग येथे सुरू असणाऱ्या विकास कामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत पाहणी करत आवश्यक सूचना केल्या. विविध विकासकामे सुरू असलेल्या ठिकाणी बारामतीच्या हवामानामध्ये टिकून राहणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करावी, आसपासचा परिसर सुशोभित करावा, कामाच्या ठिकाणी येणा-या नागरिकांना प्रसन्न वाटावे, अशा प्रकारचे वातावरण असावे, अशा सूचना दिल्या.

कोरोनाचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याचे एेकूनच आला हार्ट अॅटॅक
            
या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांना विकासकामांकरिता मंजूर केलेल्या निधीचा वापर वेळेत करावा, विकासकामेही दर्जेदार असावीत. तसेच, आवश्यक असल्यास वाढीव निधीबाबत प्रस्ताव तत्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar inspects development works in Baramati